Shafali Verma : 20 वर्षाच्या शफालीनं केला मोठा धमाका; ठोकलं महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात वेगवान द्विशतक

INDW vs RSAW Test Day 1 : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताने केला मोठा धमाका.
Shafali Verma
Shafali Verma INDW vs RSAW esakal
Updated on

Shafali Verma Fastest Double Hundred : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर शफाली वर्माने आपले पहिलेच कसोटी शतक हे द्विशतकात रूपांतरित केलं. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी भारताने अनेक विक्रमांना गवसणी घातली. 20 वर्षाच्या सलामीवीर शफाली वर्माने 194 चेंडूत द्विशतकी खेळी करत महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक ठोकण्याचा मान पटकावला. शफाली वर्माने 194 चेंडूत 205 धावांची खेळी केली. मात्र या खेळीनंतर ती धावबाद झाली. शफालीने आपली खेळी तब्बल 23 चौकार आणि 8 षटकारांनी सजवली. 92

Shafali Verma
IND vs RSA T20 WC 24 Final : भारत - दक्षिण आफ्रिका फायनल सामन्यात पडणार पाऊस; कसे असतील राखीव दिवसाचे नियम?

भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघात सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामी जोडी स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी 292 धावांची दमदार सलामी दिली. ही महिला कसोटी क्रिकेटमधील पहिल्या विकेटसाठी करण्यात आलेली सर्वात मोठी भागीदारी ठरली.

संघाची उपकर्णधार स्मृतीचे दीडशतक अवघ्या एका धावेने हुकले. तिने 161 चेंडूत 149 धावा केल्या. स्मृतीने आपल्या कसोटी क्रिकेटमधील 500 धावा देखील पूर्ण केल्या. मिताली राजनंतर भारताकडून महिला क्रिकेट कसोटी सामन्यांमध्ये 500 धावा पूर्ण करणारी ती दुसरी क्रिकेटपटू ठरली.

Shafali Verma
INDW vs RSAW : शाब्बास मुलींनो! स्मृती अन् शफालीनं 90 वर्षाच्या इतिहासात जे झालं नाही ते करून दाखवलं

दरम्यान, या भागीदारीनंतर शफली वर्माने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत आपलं दीडशतक पूर्ण केले. त्यानंतर तिसऱ्या सत्रात तिनं आक्रमक फलंदाजी करत 194 चेंडू द्विशतकी मजल मारली. मिताली राजनंतर महिला कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणारी शफाली ही दुसरीच बॅटर ठरली. मिताली राजने इंग्लंडविरूद्ध 407 चेंडूत 214 धावा केल्या होत्या.

भारत - आफ्रिका सामन्याबद्दल बोलायचं झालं तर कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने 450 धावांचा टप्पा पार केला. भारताने दिवसाचा खेळ संपायला अजून काही षटके शिल्लक असताना 93 षटकात 4 बाद 479 धावा केल्या होत्या. स्मृतीच्या 149 अन् शफालीच्या 205 धावांव्यतिरिक्त जेमिमा रॉड्रिग्जने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत 36 आणि रिचा घोष 15 धावा करून नाबाद होते. आफ्रिकेकडून डेलमी टकरने 2 विकेट्स घेतल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.