Suresh Raina: रैनाने शाहिद आफ्रिदीच्या सांगण्यावरून ट्वीट केलं डिलीट? पाकिस्तानचा माजी कर्णधाराचा दावा; जाणून घ्या प्रकरण

Shahid Afridi - Suresh Raina: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताच्या सुरेश रैनाने त्याच्याबाबत केलेल्या ट्वीटबाबत अखेर मौन सोडले आहे.
Shahid Afridi | Suresh Raina
Shahid Afridi | Suresh RainaSakal

Shahid Afridi - Suresh Raina: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताच्या सुरेश रैनाने त्याच्याबाबत केलेल्या ट्वीटबाबत अखेर भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी रैनाने पाकिस्तानी पत्रकाराला उत्तर देताना एक ट्वीट केले होते, जे नंतर त्याने डिलीट केले होते.

झाले असे की जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आयसीसीने युवराज सिंग, ख्रिस गेल, उसेन बोल्ट यांच्यासह शाहिद आफ्रिदीला ब्रँड अँबेसिडर म्हणून घोषित केले आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी पत्रकाराने सुरेश रैनाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता.

Shahid Afridi | Suresh Raina
WI vs AUS, Warm-Up Match: वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियाला पराभवाचा दणका; पूरनची 300 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी

पाकिस्तानी पत्रकाराने ट्वीट केले होते की 'आयसीसीने शाहिद आफ्रिदीला आयसीसी टी20 वर्ल्ड कपसाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून निवडले आहे, हॅलो सुरेश रैना?'

त्यावर रैनाने उत्तर दिले होते की 'मी आयसीसीचा अँबेसिडर नाही, पण माझ्या घरी 2011 वनडे वर्ल्ड कप आहे. मोहालीचा सामना लक्षात आहे ना? आशा आहे की तुम्हाला काही अविस्मरणीय क्षण आठवले असतील.'

दरम्यान, रैनाच्या या ट्वीटची क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. आता आफ्रिदीने असा दावा केला आहे की त्याने रैनाशी चर्चा केली, यानंतर रैनाने ते ट्वीट डिलीट केले.

Shahid Afridi | Suresh Raina
Babar Azam: T20 क्रिकेटमध्ये बाबर आझमचा मोठा कारनामा, आता विराट-रोहितशी वर्ल्ड कपमध्ये रंगणार शर्यत

आपल्या यु्ट्यूब चॅनेलवर बोलताना आफ्रिदी म्हणाला, 'रैना आणि मी अनेक क्रिकेटमधील क्षण एकत्र घालवले आहेत आणि तो खूप चांगला व्यक्ती आहे. कधीकधी काही मस्करी होत असते.

'मी त्याची सोशल मीडियावरील पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्याशी बोललो. त्याने लहान भावाप्रमाणे परिस्थिती समजून घेतली. तो ट्वीट डिलीट करण्यासाठी तयार झाला. सर्व चांगले आहे, अशा गोष्टी होत राहतात.'

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 2011 वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान उपांत्य सामन्यात आमने-सामने होते. मोहालीत झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला 29 धावांनी पराभूत केले होते. यावेळी पाकिस्तानचे नेतृत्व शाहिद आफ्रीदीकडे होते, तर भारताचे नेतृत्व एमएस धोनीकडे होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com