IND vs BAN: रोहित शर्माची विकेट शाकिबसाठी ठरली विश्वविक्रमी! टी20 वर्ल्ड कपमध्ये 'हा' पराक्रम करणारा पहिलाच क्रिकेटर

Shakib Al Hasan Record: टी20 वर्ल्ड कपमधील सुपर-8 च्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माला बाद करत शाकिब अल हसनने मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली.
Shakib Al Hasan
Shakib Al HasanSakal
Updated on

T20 World Cup 2024, India vs Bangladesh: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुपर-8 फेरीतील सामना शनिवारी झाला. अँटिग्वामधील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा शाकिब अल हसनने मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी सुरुवात चांगली केली होती. रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला होता.

Shakib Al Hasan
T20 World Cup: तुच घे बाबा! ऋषभ पंत कॅच घेत असताना कर्णधार रोहितने दिली भन्नाट रिअ‍ॅक्शन, ICC ने शेअर केला Video

मात्र, चौथ्या षटकात बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन गोलंदाजीसाठी आला. त्याने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर रोहित शर्माने मोठा शॉट खेळला. त्यावर जाकेर अलीने त्याचा झेल घेतला. त्यामुळे रोहितला 11 चेंडूत 23 धावा करून माघारी परतावे लागले.

ही विकेट शाकिबसाठी विक्रमी ठरली, कारण ही त्याची टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील 50 वी विकेट ठरली. टी20 वर्ल्ड कप इतिहासात 50 विकेट्स घेणारा शाकिब पहिला गोलंदाज ठरला आहे.

शाकिबने 2007 पासून टी20 वर्ल्ड कप खेळताना 42 सामन्यांमध्ये 50 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याव्यतिरिक्त कोणालाही 40 हून अधिक विकेट्स अद्याप टी20 वर्ल्ड कपमध्ये घेता आलेल्या नाहीत.

Shakib Al Hasan
T20 World Cup: अन् तिथेच इंग्लंडने मॅच गमावली, पाहा द. आफ्रिकेच्या कर्णधाराने मागे पळत येत पकडलेला अविश्वसनीय कॅच

टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स

  • 50 विकेट्स - शाकिब अल हसन (42 सामने)

  • 39 विकेट्स - शाहिद आफ्रिदी (34 सामने)

  • 38 विकेट्स - लसिथ मलिंगा (31 सामने)

  • 37 विकेट्स - वनिंदू हसरंगा (19 सामने)

  • 36 विकेट्स - सईद अजमल (23 सामने)

  • 36 विकेट्स - टीम साऊदी (25 सामने)

रोहित-शाकिबचा अनोखा विक्रम

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की रोहित आणि शाकिब हे दोनच असे खेळाडू आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत झालेले सर्व टी20 वर्ल्ड कप खेळले आहेत. म्हणजेच 2007 साली झालेल्या पहिल्या टी20 वर्ल्ड कपपासून झालेल्या सर्व 9 टी20 वर्ल्ड कपच्या पर्वात रोहित आणि शाकिब सहभागी झालेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.