Babar Azam: 'बाबरला कर्णधार करणारा तो आईनस्टाईन आहे तरी कोण?', पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर भडकला

Babar Azam: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत गतउपविजेत्या पाकिस्तान संघाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आल्यानंतर सध्या कर्णधार बाबर आझमवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
Babar Azam
Babar AzamX/ICC
Updated on

Babar Azam: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत गतउपविजेत्या पाकिस्तान संघाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. त्यांच्यावर अमेरिकेविरुद्ध पराभव स्विकारण्याची नामुष्कीही ओढावली होती. त्याचमुळे पाकिस्तान संघावर आणि कर्णधार बाबर आझमवर टीकेची झोड उठली आहे.

अनेक माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तान संघावर टीका केली आहे. यात आता शोएब अख्तरचीही भर पडली असून त्यानं बाबर आझमला पुन्हा कर्णधार करण्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे.

Babar Azam
Babar Azam: 'मी असतो तर त्वरित कॅप्टन्सी सोडली असती...', माजी कर्णधाराने बाबरवर साधला निशाणा

खरंतर बाबर आझमने 2023 वनडे वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान संघाचे तिन्ही क्रिकेट प्रकारातील कर्णधारपद सोडले होते. परंतु, टी20 वर्ल्ड कप 2024 पूर्वी शाहिन शाह आफ्रिदीला हटवून त्याला पुन्हा एकदा पाकिस्तानच्या टी20 संघाचे नेतृत्व देण्यात आले.

बट स्पोर्ट्स टीव्हीशी बोलताना अख्तर म्हणाला, 'पहिली गोष्ट म्हणजे बाबर आझमला कोणी कर्णधार केले? त्याला कर्णधार करणारा तो आईनस्टाईन कोण होता? मला त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचे आहे. तो त्या जबाबदारीसाठी खरंच पात्र होता की नाही? त्याला नेतृत्वाबद्दल एखाददोन गोष्टी तरी माहित आहेत का?'

Babar Azam
T20 World Cup: भारत-बांगलादेश संघात सुपर-8 ची महत्त्वाची लढत! हेड-टू-हेड रेकॉर्ड अन् हवामान, जाणून घ्या सर्व डिटेल्स

अख्तर पुढे म्हणाला, 'मी हे म्हणत आहे की बाबर कर्णधारपदासाठी योग्य नाही. आता बाबरबाबत काय होऊ शकते? तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. त्याने सामना संपवायला हवा. त्याने सामने जिंकायला हवेत. जर तो जिंकवू शकत नसेल, तर तो टी20 संघातील त्याचे स्थान कायम राखू शकत नाही.'

'मी हे आत्ता सांगत आहे की जर तो सामना संपवू शकत नसेल, तर तो वनडेतही त्याचे स्थान कायम ठेवू शकत नाही. बाबर आझममधील फिनिशर बाहेर यायला हवा. ज्यावेळी गरज असेल, दबाव असेल, तेव्हा त्याने जबाबदारी घ्यायला हवी. मी हे उगीचच म्हणत नाहीये. बाबर सुपरस्टार म्हणूनच लक्षात राहिल, पण त्याने सामने संपवायला हवेत.'

दरम्यान, बाबर आझमने टी20 वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचे आव्हान संपल्यानंतर म्हटले होते की तो नेतृत्वाबाबत मायदेशी परतल्यानंतर विचार करेल. आता सातत्याने होत असलेल्या टीकेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डही मोठी पाऊले उचलणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.