SA vs WI: वेस्ट इंडिजच्या पराभवानं टी20 वर्ल्ड कपची परंपरा राहिली कायम, गेल्या 9 स्पर्धांमध्ये 'असंच' घडलंय

T20 World Cup 2024: दक्षिण आफ्रिकेने टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यासह टी20 वर्ल्ड कपमधील एक प्रथाही कायम राहिली.
West Indies
West IndiesSakal

T20 World Cup 2024, South Africa vs West Indies: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघात सुपर-8 मधील सामना झाला. अँटिग्वाला झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 3 विकेट्सने विजय मिळवला. यासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.

दरम्यान, या पराभवामुळे मात्र यजमान वेस्ट इंडिजचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. यामुळे गेल्या 8 टी20 वर्ल्ड कपमध्ये घडलेली परंपराच यंदा चालू असलेल्या 9 व्या टी20 वर्ल्ड कपमध्येही कायम राहिल्याचे दिसून आले.

9 व्या म्हणजेच टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचे यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्याकडे होते. मात्र, या दोन्ही संघांचे आव्हान सुपर-8 फेरीतच संपुष्टात आले आहे.

West Indies
T20 World Cup 2024: ऑस्ट्रेलिया की भारत, T20 मध्ये कोणाचं पारडं राहिलंय जड? पाहा आकडेवारी काय सांगते

त्यामुळे यंदाच्या टी२० वर्ल्ड कपलाही परदेशी संघच विजेतेपद जिंकताना दिसणार आहे. यापूर्वी झालेल्या आठही टी२० वर्ल्ड कपचे विजेतेपद कधीही यजमान संघाने जिंकलेले नाही. यंदाही ही प्रथा कायम राहिली.

आत्तापर्यंतचे विजेते

टी20 वर्ल्ड कप सर्वात आधी 2007 साली दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. त्यामुळे भारताने विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर 2009 साली इंग्लंडमध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पाकिस्तानने जिंकले होते. 2010 साली वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप झाला होता, ज्याचे विजेतेपद इंग्लंडने जिंकले होते.

2012 साली श्रीलंकेत झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजने विजेतेपदाला गवसणी घातली होत. 2014 साली बांगलादेशमध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपचे विजेतेपद श्रीलंकेने जिंकले होते. साल 2016 मध्ये टी20 वर्ल्ड कप भारतात खेळवण्यात आलेला, ज्याचे विजेतेपद वेस्ट इंडिजने जिंकले होते.

West Indies
T20 World Cup: नवा ट्विस्ट! ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान जाणार बाहेर, तर बांगलादेश मारणार सेमीफायनलमध्ये एन्ट्री? जाणून घ्या गणित

यानंतर 2021 मध्ये भारतच टी20 वर्ल्ड कपचा यजमान होता, मात्र कोरोनाच्या कारणाने स्पर्धा युएईमध्ये झाली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाला गवसणी घातली होती. तसेच 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया टी20 वर्ल्ड कपचे यजमानपद सांभाळले होते, पण इंग्लंडने विजेतेपद जिंकले होते.

दक्षिण आफ्रिकेचा विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 135 धावा केल्या होत्या.

मात्र, नंतर पावसामुळे षटके कमी करण्यात आली आणि दक्षिण आफ्रिकेसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 17 षटकात 123 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. या लक्ष्याचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने 16.1 षटकात 7 विकेट्स गमावत पूर्ण केला.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com