RSA vs NEP : नेपाळ जिंकता जिंकता हरली! 1 बॉल 2 धावा हव्या असताना क्लासेनने केलं मोठं काम

T20 World Cup 2024 : नेपाळने अवघ्या 5 धावात आपले 4 फलंदाज गमावले. तबरेज शम्सीने दक्षिण आफ्रिकेची लाज वाचवली.
RSA vs NEP
RSA vs NEP T20 World Cup 2024 esakal
Updated on

RSA vs NEP T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकप 2024 च्या ग्रुप D मधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नेपाळचा शेवटच्या चेंडूवर पराभव करत आपला मानहानीकारक पराभव टाळला. शेवटच्या चेंडूवर नेपाळला विजयासाठी 2 धावांची गरज असताना क्लासेनने गुलशन झा ला धावबाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात फिरकीपटू तबरेज शम्सीचा सिंहाचा वाटा होता. त्याने 4 षटकात 19 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. नेपाळकडून आसिफ शेखने झुंजार खेळी करत 42 धावा केल्या. त्याला अनिल साहने 27 धावा केल्या.

RSA vs NEP
USA vs IRE : युएसएनं इतिहास रचला! वरूणराजाच्या कृपेनं गाठली सुपर 8, पाकिस्तानचं झालं पॅक अप

ग्रुप D च्या नेपाळ विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाैजी करण्याचा निर्णय घेतला. नेपाळने दमदार गोलंदाजी करत तगडी फलंदाजी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 115 धावात रोखलं.

दक्षिण आफ्रिकेने रिझा हेंड्रिक्सच्या 43 धावांच्या जोरावर पहिल्या 10 षटकात चांगली सुरूवात केली होती. त्यांनी 11.2 षटकात 2 बाद 68 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर नेपाळने टिच्चून मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या मुसक्या आवळल्या. दिपेंद्र सिंहने 3 तर कुशल भुरटेलने 4 षटकात 4 विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सने 18 चेंडूत नाबाद 27 धावा केल्याने आफ्रिकेला 20 षटकात 7 बाद 115 धावांपर्यंत मजल मारता आली.

RSA vs NEP
IND vs CAN Playing 11 : रोहित विराटबाबत घेणार मोठा निर्णय? 3 सामन्यात फेल गेल्यानंतर...

दक्षिण आफ्रिकेचे 115 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरेलेल्या नेपाळने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात केली. मात्र आठव्या षटकात तबरेज शम्सीने कुशाल भुरटेल आणि रोहित पौडेलला बाद करत नेपाळला दोन धक्के दिले.

त्यानंतर सलामीवीर आसिफ शेख आणि अनिल साहने नेपाळचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 50 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र मार्करमने अनिल साहला 27 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. अनिल बाद झाला त्यावेळी नेपाळ 14 षटकात 85 धावांवर पोहचला होता. नेपाळला विजयासाठी 36 चेडूत 30 धावांची गरज होती.

सामना नेपाळच्या हातात होता असं वाटत होतं. नेपाळ दक्षिण आफ्रिकेला मात देत यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील अजून एक मोठा उलटफेर करणार इतक्यात तबरेज शम्सी आफ्रिकेच्या मदतीला धावून आला.

त्यानं पुन्हा एकदा एकाच षटकात दोन विकेट्स घेत नेपाळला बॅकफूटवर ढकललं. त्यानं 18 व्या षटकात दिपेंद्रसिंह ऐरीला अन् 49 चेंडूत 42 धावा करणाऱ्या आसिफ शेखला बाद केलं. पाठोपाठ नॉर्खियाने कुशल मालाला 1 धावेवर बाद करत नेपाळची अवस्था 2 बाद 85 धावांवरून 6 बाद 100 धावा अशी केली.

आता नेपाळला शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावांची गरज होती. बार्टमन शेवटचं षटक टाकत होता. पहिले दोन चेंडू गुलशन झाने वाया घालवले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार मारत सामना 3 चेंडूत 4 धावा असा आणला. झाने चौथ्या चेंडूवर दोन धावा घेत सामना 2 चेंडूत 2 धावा असा आणला.

मात्र पाचव्या चेंडूवर गुलशनला एकही धाव करता आली नाही. शेवटच्या चेंडूवर नेपाळला विजयासाठी 2 तर सामना टाय करण्यासाठी 1 धावेची गरज होती. मात्र गुलशन झा चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला. त्याला क्लासेनने धावबाद केलं.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.