T20 World Cup 2024: अन् मार्करमच्या दक्षिण आफ्रिकेचं क्षणात तुटलं स्वप्न! जर जिंकले असते तर...

India vs South Africa: भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ विजेतेपद जिंकलं अन् दक्षिण आफ्रिकेचा मात्र स्वप्न भंग झाला. असं असलं तरी त्यांच्यासाठी आणि कर्णधार एडेन मार्करमसाठी हा अंतिम सामन्यात अनेक गोष्टींमुळे ऐतिहासिक ठरला.
Aiden Markram | South Africa | T20 World Cup 2024
Aiden Markram | South Africa | T20 World Cup 2024Sakal
Updated on

T20 World Cup 2024 Final, India vs South Africa: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (२९ जून) बार्बाडोसला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत अत्यंच रोमांचक झालेल्या या अंतिम सामन्यात भारताने अवघ्या ७ धावांनी विजय मिळवला आणि दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरलं. मात्र भारताच्या या विजयानं दक्षिण आफ्रिकेचं पहिल्या वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न मात्र भंगलं.

दक्षिण आफ्रिकेने यंदा एडेन मार्करमच्या नेतृत्वात पहिल्यांदाच पुरुषांच्या वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम सामना गाठला होता. मात्र त्यांना विजेतेपदासाठी अवघे ८ धावा कमी पडल्या. जर ते जिंकले असते, तर अनेक ऐतिहासिक विक्रम नोंदवले गेले असते.

पण असं असलं तरी हा अंतिम सामना अनेक अर्थांनी दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाचा ठरला. पहिली गोष्ट म्हणजे हा त्यांचा पहिलाच वर्ल्ड कप अंतिम सामना होता.

Aiden Markram | South Africa | T20 World Cup 2024
Virat Kohli : टी 20 वर्ल्डकपच्या फायनलचा किंग! विराटच्या संथ अर्धशतकानं पकडला वेग, रोहितचा विश्वास ठरवला सार्थ

दक्षिण आफ्रिकेला आत्तापर्यंत अनेक दिग्गज कर्णधार लाभलेत, मग शॉन पोलॉक असो, हेन्री क्रोनिए, ग्रॅमी स्मिथ, एबी डिविलियर्स, फाफ डू प्लेसिस, क्विंटन डी कॉक असे अनेक. पण तरीही दक्षिण आफ्रिकेला आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेण्याचा मान मिळाला तो एडेन मार्करमला.

एक साधारण खेळाडू, त्याच्याबद्दल फार गाजावाजा नाही, पण तरी आफ्रिकेचा भरवशाचा आणि महत्त्वाचा खेळाडू. याच मार्करमने शनिवारी अंतिम सामन्यात इतिहास रचला.

तो कोणत्याही वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाचे नेतृत्व करणारा पहिला खेळाडू ठरला. तो जर अंतिम सामना जिंकला असता, तर दक्षिण आफ्रिकेच्या वरिष्ठ पुरुष संघाला वर्ल्ड कप जिंकून देणारा पहिला कर्णधार ठरला असता.

Aiden Markram | South Africa | T20 World Cup 2024
T20 World Cup Final : सुसाट सुटलेली आफ्रिकेची गाडी शेवटच्या टप्प्यावर अडखळली, शेवटच्या तीन षटकांत काय घडले?

विशेष गोष्ट अशी की हा तोच मार्करम आहे, ज्याने २०१४ साली दक्षिण आफ्रिकेला पहिलं वहिला वर्ल्ड कप सामना जिंकून दिला होता. हो हे खरंय २०१४ साली मार्करमने १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व केलं होतं. त्याच्याच नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने तो वर्ल्ड कपही जिंकला होता.

याच संघात सध्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडा देखील होता. मार्करमची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो टी२० वर्ल्ड कप २०२४ मधील अंतिम सामन्यापूर्वी कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धेतील एकही सामना पराभूत झालेला नव्हता. शनिवारी झालेला पराभव कर्णधार म्हणून त्याचा आयसीसी स्पर्धेतील पहिला पराभव.

त्याने २०१४ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत ६ पैकी ६ सामने जिंकले होते. त्यानंतर २०२३ वनडे वर्ल्ड कपमध्येही त्याने तेंबा बाऊमाच्या अनुपस्थितीत २ सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले होते.

या दोन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. त्यानंतर टी२० वर्ल्ड कप २०२४ मध्येही त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने सलग ८ सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र अखेर अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.