RSA Vs ENG : डिकॉक-मिलरनं आफ्रिकेला सावरलं; 163 धावांचं आव्हानही इंग्लंडला जाणार जड?

T20 World Cup 2024 : चांगल्या सुरूवातीनंतर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली. अखेर मिलरने डाव सावरला.
RSA vs ENG
South Africa Vs England esakal

South Africa Vs England : टी 20 वर्ल्डकप 2024 च्या सुपर 8 सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 6 बाद 163 धावा केल्या. आफ्रिकेकडून डिकॉकने 65 धावांची खेळी केली. डेव्हिड मिलरने 43 धावा केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

RSA vs ENG
Lionel Messi : आता निवृत्त व्हा! गोलपोस्ट तशी रिकामीच होती तरी मेस्सीला करता आली नाही गोल, Video व्हायरल

डिकॉक आणि रिझा हेंड्रिक्सने दमदार सुरूवात करत 86 धावांची सलामी दिली. डिकॉकने आक्रमक फलंदाजी करत 38 चेंडूत 65 धावा केल्या. मात्र यानंतर आफ्रिकेची धावगती मंदावली. आफ्रिकेला शतकी मजल मारण्यासाठी 14 वे षटक उजडावे लागले.

शेवटच्या 5 षटकात डेव्हिड मिलरने आक्रमक फलंदाजी करत ड्रॉप झालेले रनरेट हे त्याने वाढवले. मिलरने 28 चेंडूत 43 धावा केल्या यामुळे आफ्रिकेने 20 षटकात 6 बाद 163 धावांपर्यंत मजल मारली.

RSA vs ENG
Sania Mirza Mohammed Shami : सानिया अन् मोहम्मद शमी करणार निकाह.... इम्रान मिर्झा स्पष्टच बोलले

आफ्रिकेचे 163 धावांचे तसे माफक आव्हान पार करताना इंग्लंड चांगली फलंदाजी करेल असं वाटलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेने टिच्चून मारा करत पॉवर प्लेमध्ये इंग्लंडला फार फटकेबाजी करून दिली नाही. केशव महाराज आणि रबाडाने इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर फिल्प सॉल्ट (11) आणि बटलर (17) यांना माघारी धाडलं.

पॉवर प्लेनंतर केशव महाराजनं जॉनी बेअरस्टोला बाद करत इंग्लंडची अवस्था 3 बाद 54 धावा अशी केली होती. बार्टमननं मोईन अलीला बाद करत इंग्लंडला चौथा धक्का दिला. 4 बाद 64 धावांवरून हॅरी ब्रुक्स आणि लाईम लिव्हिंगस्टोनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com