T20 World Cup: अमेरिका विरुद्ध पाकिस्तान सामन्यात झाली चेंडूशी छेडछाड, माजी क्रिकेटरचा खळबळजनक आरोप

USA vs PAK: टी20 वर्ल्ड कपमधील अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने चेंडूशी छेडछाड करण्याचा आरोप माजी क्रिकेटपटूने केला आहे.
Pakistan Cricket | T20 World Cup
Pakistan Cricket | T20 World CupeSakal
Updated on

T20 World Cup 2024, USA vs PAK: अमेरिका क्रिकेट संघाने गुरुवारी (6 जून) पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. टी20 वर्ल्ड कपमधील 11व्या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये 5 धावांनी पराभूत केले. त्यामुळे सध्या अमेरिकेच्या या विजयाची जोरदार चर्चा होत आहे.

अशातच आता रस्टी थेरॉन हा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जो अमेरिकाकडूनही क्रिकेट खेळला आहे, त्याने पाकिस्तानवर चेंडू छेडछाडीचा आरोप केला आहे. त्याने आयसीसीला टॅग करत सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केले आहे. त्याने म्हटले आहे की पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफने रिव्हर्स स्विंगसाठी चेंडू छेडछाडीचा प्रयत्न केला.

Pakistan Cricket | T20 World Cup
USA vs PAK: नितीश कुमारच अमेरिकेचे इम्पॅक्ट प्लेअर! पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या चेंडूवर ठोकला चौकार, विरूनेही घेतली मज्जा

या सामन्यात पाकिस्तानने अमेरिकेसमोर 160 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेने कर्णधार मोनंक पटेलच्या अर्धशतकाच्या जोरावर चांगली सुरुवात केली होती.

पण दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानने पुनरागमन केले आणि अमेरिकेला धावांसाठी संघर्ष करायला लावला होता. त्यामुळे अमेरिकेलाही 20 षटकात 3 बाद 159 धावाच करता आल्या आणि सामना बरोबरीत संपला.

दरम्यान, थेरॉनने म्हटले 'नुकतेच बदलण्यात आलेल्या चेंडूला पाकिस्तान कुरडतडत नसल्याचा आपण आव आणत आहोत का? दोन षटकांपूर्वी बदलण्यात आलेला चेंडू रिव्हर्स होत आहे. तुम्ही खरोखर पाहू शकता की हॅरिस रौफ त्याचा अंगठा चेंडूवर घासत आहे.'

दरम्यान, यावर आयसीसी, पाकिस्तान क्रिकेट किंवा अमेरिका क्रिकेटकडून कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

Pakistan Cricket | T20 World Cup
Saurabh Netravalkar: पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये धूळ चारणाारा सौरभ मुंबईतून कसा पोहचला अमेरिकेत? जाणून घ्या प्रवास

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर सुपर ओव्हर होण्यापूर्वी अमेरिकेला अखेरच्या षटकात विजयासाठी 15 धावांची गरज होती. यावेळी पाकिस्तानकडून हॅरिस रौफने गोलंदाजी केली. पण त्याच्याविरुद्ध अमेरिकेच्या ऍरॉन जोन्स आणि नितीश कुमार यांनी 14 धावा ठोकत सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.

सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने 1 बाद 18 धावा करत पाकिस्तानला 19 धावांचे लक्ष्य दिलेले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला 1 बाद 13 धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.