Virat Kohli : तीन सामन्यात फेल याचा अर्थ... विराटच्या खराब कामगिरीवर गावसकर नेमकं काय बोलले?

T20 World Cup 2024 : सलग तीन सामन्यात विराटची कामगिरी सुमार झाली. सुनिल गावसकरांनी विराटच्या कामगिरीवर मत व्यक्त केलं आहे.
Virat Kohli
Virat Kohli Sunil Gavaskar T20 WC 2024esakal
Updated on

Virat Kohli Sunil Gavaskar T20 WC 2024 : भारताचा रन मशिन विराट कोहलीने आयपीएलच्या 17 व्या हंगामात धावांचा पाऊस पाडला होता. त्यानं 700 पेक्षा जास्त धावा करत ऑरेंज कॅम मिळवली होती. आता विराट कोहली टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील धावांचा रतीब घालणार असं वाटत होतं. मात्र ग्रुप स्टेजच्या पहिल्या तीन सामन्यात विराट कोहलीला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.

Virat Kohli
Pakistan Cricket Team : पाकिस्तान संघावर चालणार देशद्रोहाचा खटला? पाकिस्तानमधील माध्यमांचा दावा

भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी आयपीएलदरम्यान अनेकवेळा विराट कोहलीवर टीका केली होती. विराट कोहलीचा सलामीवीर म्हणून स्ट्राईक रेट हा कमी असल्याचं अनेक जाणकारांच म्हणणं होतं. ज्यावेळी भारतीय संघ निवडीची चर्चा सुरू होती त्यावेळी विराट कोहलीचा हा संथपणा चर्चेत होता. विराट भारताच्या टी 20 संघात बसत नाही असे देखील मत जाणकार व्यक्त करत होते.

आता विराटचा खराब कामगिरीनंतर सुनिल गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावसकर म्हणाले, 'विराट कोहलीला याची जाणीव आहे. आपण स्पर्धेच्या सुरूवातीच्या सामन्यांबद्दल बोलतोय. अजून सुपर 8 सेमी फायनल आणि आशा आहे की फायनल सामना देखील होईल. विराटला आता स्वतःवर विश्वास ठेवावा लागले. मला वाटतं की त्याच्याकडे तो आत्मविश्वास आहे.'

Virat Kohli
Saurabh Netravalkar : सौरभ नेत्रावळकरची कंपनी Oracle चे शेअर्स चांगलेच वाढले, न्यूयॉर्क पाठोपाठ BSE मध्येही दमदार कामगिरी

गावसकर पुढे म्हणाले की, 'ज्यावेळी तो तीनही सामन्यात कमी धावा करता याचा अर्थ तो खराब बॅटिंग करतोय असं नाही. काहीवेळा चेंडू चांगला पडलेला असतो. हाच चेंडू दुसऱ्या एका दिवशी वाईड गेला असता किंवा चौकार गेला असता मात्र आज तो गेला नाही. काळजी करण्याचं काही कराण नाही. आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. तो लवकरच चांगल्या फॉर्ममध्ये परतेल.'

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.