Sunil Gavaskar : रोहित लाडका तर विराट.... गावसकरांवर नेटकरी एवढे का भडकले?

T20 World Cup 2024 : सुनिल गावसकर भारत - बांगलादेश सामन्यादरम्यान नेमकं असं काय बोलले?
Sunil Gavaskar
Sunil Gavaskar T20 World Cup 2024esakal
Updated on

Sunil Gavaskar T20 World Cup 2024 : भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर हे नेटकऱ्यांच्या रडावर आले आहेत. त्यांनी टी 20 वर्ल्डकप 2024 च्या सुपर 8 मधील भारत - बांगलादेश सामन्यात समालोचन करताना रोहित आणि विराट बाद झाल्यावर दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांना रूचली नाही. रोहित शर्माने 11 चेंडूत 23 धावा केल्या होत्या. त्यानंतर तो मोठा फटका मारण्याचा नादात बाद झाला. रोहितने केलेल्या या खेळीमुळे भारताने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात केली.

दरम्यान, सलामीलाच आलेल्या विराट कोहलीने 28 चेंडूत 37 धावा केल्या. गावसकरांनी रोहित शर्माच्या खेळीचे सेल्फलेस खेळी असा उल्लेख करत स्तुती केली. मात्र ज्यावेळी विराट कोहली बाद झाला त्यावेळी गावसकरांनी कडक शब्दात टीका केली होती. त्यामुळे विराट कोहलीचे फॅन जाम भडकले.

Sunil Gavaskar
Bajrang Punia : बजरंग पुनियाच्या अडचणी वाढल्या; NADA ने पुन्हा केलं निलंबित

रोहित शर्मा हा शाकिबला मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला होता. त्याने याच षटकात एक षटकार आणि चौकार मारला होता. रोहित बाद झाल्यानंतर गावसकर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाले की, 'एखादा फलंदाज दोन चेंडूत 10 धावा केल्या असताना पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करणार नाही. मात्र रोहित शर्माने मारला. तो सर्वकाही संघासाठी करतोय.

दरम्यान विराट कोहलीने 28 चेंडूत 37 धावा करत आपण पुन्हा टचमध्ये आलो असल्याचे दाखवून दिलं. मात्र तो तनजीम हसन शाकिबने विराट कोहलीचा त्रिफळा उडवला. विराट बाद झाल्यावर गावसकर म्हणाले की, 'तो काय विचार करत होता? इनसाईड आऊट खेळण्याची गरज होती का?

Sunil Gavaskar
AUS vs AFG सामन्यात गरमा गरमी! स्टॉयनिसच्या सेंडऑफला गुरबाजचं चोख प्रत्युत्तर, ICC ने शेअर केला Video

गावसकर यांनी रोहित आणि विराटबद्दल दोन वेगवेगळी मते व्यक्त केल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली. नेटकऱ्यांनी गावसकर हे दुजाभाव करतात असा आरोप केला.

एका नेटकऱ्याने, 'चाहते नाही तर गावसकरांसारखे समालोचक हे फॅन्स आणि खेळाडूंमध्ये मतभेद घडवून आणतात.'

रोहित आणि कोहली यांच्याबरोबरच हार्दिक पांड्याने देखील चांगले योगदान दिले. त्याने अर्धशतकी खेळी केली. ऋषभ पंतने 36 तर शिवम दुबेने 34 धावांचे योगदान दिलं. यामुळे भारताने 20 षटकात 5 बाद 196 धावा केल्या. भारतीय संघाने सेमी फायनलमधील आपले स्थान जवळपास पक्क केलं आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.