Suryakumar Yadav Injured : सुपर-8 सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू जखमी; कर्णधार रोहित टेन्शनमध्ये

भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. आता या फेरीतील संघाचा पहिला सामना 20 जून रोजी बार्बाडोस येथे अफगाणिस्तानशी होणार आहे. मात्र याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
Suryakumar Yadav Injured India in T20 World Cup Super 8
Suryakumar Yadav Injured India in T20 World Cup Super 8 sakal
Updated on

Suryakumar Yadav Injured India in T20 World Cup Super 8 : भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. आता या फेरीतील संघाचा पहिला सामना 20 जून रोजी बार्बाडोस येथे अफगाणिस्तानशी होणार आहे. मात्र याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

जगातील नंबर वन टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादव सोमवारी जखमी झाला. प्रशिक्षणादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाल्याने टीम इंडियाची चिंता वाढली आहे. खरं तर, काल भारतीय संघाने बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनमध्ये सराव सत्राला सुरुवात केली.

Suryakumar Yadav Injured India in T20 World Cup Super 8
Igor Stimac : भारतीय फुटबॉल फेडरेशननं कोच इगोर स्टिमॅक यांची 'या' कारणामुळं केली उचलबांगडी

यावेळी नेटमध्ये फलंदाजी करताना स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या हाताला दुखापत झाली, त्यानंतर फिजिओने येऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. सूर्याच्या हाताला किती गंभीर दुखापत झाली आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अफगाणिस्तानविरुद्धचा सामनाही टीम इंडियाचा कॅरेबियन भूमीवरचा पहिला सामना असेल.

Suryakumar Yadav Injured India in T20 World Cup Super 8
Lockie Ferguson : 4 षटके... 0 धावा... 3 विकेट्स; टी 20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत कधीच घडलं नाही ते लोकीनं करून दाखवलं

भारत विरुद्ध कॅनडा सामना पावसामुळे रद्द

यापूर्वी 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने अ गटाचे सर्व सामने अमेरिकेत खेळले होते. भारताचे तीन सामने न्यूयॉर्कमध्ये झाले. त्याचवेळी, कॅनडाविरुद्ध फ्लोरिडामध्ये शनिवारी संघाचा शेवटचा साखळी सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाला आपल्या कॉम्बिनेशनचा प्रयोग करायलाही वेळ मिळालेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.