Video : 148 kmph गतीचा यॉर्कर, बॅट उचलताच रसेलच्या उडल्या दांड्या

पहिल्यांदा बॅटिंग करताना वेस्ट इंडीज संघाने निर्धारित 20 षटकात 8 बाद 143 धावा केल्या.
Andre Dwayne Russell
Andre Dwayne RussellT 20 World Cup Twitter
Updated on
Summary

पहिल्यांदा बॅटिंग करताना वेस्ट इंडीज संघाने निर्धारित 20 षटकात 8 बाद 143 धावा केल्या.

T20 World Cup 2021, South Africa vs West Indies : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना वेस्ट इंडीज संघाने निर्धारित 20 षटकात 8 बाद 143 धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून एविन लुईसने 35 चेंडूत केलेल्या 56 धावांच्या खेळीशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. कर्णधार पोलार्डने संघाच्या धावसंख्येत 26 धावांची भर घातली.

लुईसने 6 षटकार आणि 3 चौकार खेचत खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे दाखवून दिले. पण त्याच्या सहकाऱ्यांना त्याच्यासारखी फटकेबाजी जमली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसने 17 धावा खर्च करुन सर्वाधिक तीन विकेट घेतल्या त्याला केशव महाराज कागिसो रबाडा यांनी 2-2 विकेट घेत उत्तम साथ दिली. आफ्रिकेच्या ताफ्यातील सर्वात वेगवान गोलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या नोर्तजेनं एक विकेट मिळवली. 4 षटकात 14 धावा खर्च करत त्याने मसल पॉवर आंद्रे रसेलला (Andre Russell) तंबूत धाडले.

Andre Dwayne Russell
कोच पदासाठी द्रविड यांचा अर्ज; BCCI देणार शास्त्रींपेक्षा मोठं पॅकेज

नॉर्तजेनं रसेलला टाकलेला चेंडू कमालीचा होता. जवळपास 148 kmph वेगाने आलेला चेंडू मारण्यासाठी रसेलने बॅट उचलली खरी. पण रसेलला चेंडू कळण्याआधीच त्याच्या दांड्या उडल्या. आयसीसीने जबरदस्त यॉर्करवर नॉर्तजेनं घेतलेल्या विकेट्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. क्रिकेट चाहते या व्हिडिओला चांगली पसंती देताना दिसते.

Andre Dwayne Russell
Video : पाक चाहत्याशी भिडला होता शमी, कॅप्टन कूल धोनीनं केली होती मध्यस्थी

वेस्ट इंडीजच्या संघाने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 55 धावांवर आटोपला होता. पहिला सामना गमावल्यानंतर स्पर्धेतील पहिला विजय नोंदवण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. केरॉन पोलार्ड, रसेल यांच्या भात्यातील फटकेबाजीचा दुष्काळ दोन वेळच्या चॅम्पियन कॅरेबियन संघाची डोकेदुखी वाढवणारी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.