दोन वेळच्या चॅम्पियनचा सलग दुसरा पराभव; आफ्रिकेनं मारली बाजी

तगडी बॅटिंग लायनअप असलेल्या वेस्ट इंडीज संघाला निर्धारित 20 षटकात 8 बाद 143 धावांत रोखले होते.
 SAvWI
SAvWI Sakal
Updated on

South Africa vs West Indies, 18th Match, Super 12 Group 1 : क्विंटन डी कॉकच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन वेळच्या टी-20 वर्ल्ड चॅम्पियन्सला पराभूत करत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियसच्या तीन विकेट आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर आफ्रिकेने तगडी बॅटिंग लायनअप असलेल्या वेस्ट इंडीज संघाला निर्धारित 20 षटकात 8 बाद 143 धावांत रोखले होते.

या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकन संघाची सुरुवात खराब झाली. टेम्बा बवुमा पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर धावबाद होऊन परतला. तो बाद झाल्यानंतर क्विंटन डी कॉकच्या जागी संधी मिळालेल्या रीझा हेन्ड्रिकने 30 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. हुसेनने त्याची विकेट घेतली.

 SAvWI
Video : 148 kmph गतीचा यॉर्कर, बॅट उचलताच रसेलच्या उडल्या दांड्या

पहिल्या दोन विकेट गमावल्यानंतर रासी वॅन डर डसन 51 चेंडूत नाबाद 43 आणि मार्करमच्या 26 चेंडूतील 51 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 8 गडी राखून स्पर्धेतील पहिला विजय निश्चित केला. सुपर 12 मधील ग्रुप 1 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 2 पैकी एका सामन्यातील विजयासह 2 गुण मिळवले असून ते या गटाती सध्याच्या घडीला चौथ्या स्थानावर पोहचले आहेत. इंग्लंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांनी पहिल्या सामन्यातील विजयासह 2 गुण मिळवत अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.