Video : मॅक्सवेलसमोर आफ्रिकेच्या कॅप्टनने टेकले गुडघे

दुसऱ्याच षटकात कर्णधार फिंचने मॅक्सवेलच्या हाती चेंडू सोपवला अन्....
AUS vs RSA
AUS vs RSA Sakal
Updated on

T20 World Cup 2021, Australia vs South Africa : टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा फिंचचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सुपर 12 च्या पहिल्याच लढतीत 7-4 च्या कॉम्बिनेशनने मैदानात उतरलेल्या फिंचने दुसऱ्याच षटकात चेंडू अष्टपैलू मॅक्सवेलच्या हाती दिला. सामन्यापूर्वीच त्याने मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर भरवसा दाखवला होता. मॅक्सवेलनंही आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याला बोल्ड केलं.

AUS vs RSA
बीसीसीआयचा मोठा निर्णय; चार खेळाडूंना बोलावले मायदेशी

टेम्बा बवुमाने 7 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने 12 धावा केल्या. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून दमदार सलामी देणारा क्विंटन डिकॉकही फार काळ मैदानात तग धरु शकला नाही. हेजलवूडने त्याला बोल्ड केले. तो 7 धावांवर बाद झाला. सराव सामन्यात धमाका करणाऱ्या रस्सी वॅनदर दुसेन यालाही हेजलवूडने स्वस्तात माघारी धाडले. हेनरिक क्लासेनच्या रुपात पॅट कमिन्सने वर्ल्ड कपमधील पहिली विकेट घेतली.

AUS vs RSA
IND vs PAK : पाक भारताच्या एक पाऊल पुढे, Playing 11 ची केली घोषणा

सुपर 12 मधील पहिल्या गटात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसोबतच इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, आणि वेस्ट इंडीज हे तगडे संघ आहेत. दुसऱ्या गटाच्या तुलनेत हा सर्वात कठिण गट बनला आहे. त्यामुळे सामना जिंकून स्पर्धेतील आपले स्थान कायम ठेवण्याचे मोठे आव्हान या गटातील संघासमोर असेल. ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी घेत चांगली सुरुवात केली आहे. आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ यातून सावरुन किती धावांपर्यंत मजल मारणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()