T20 WC: बुमराह, रबाडा नव्हे 'हा' गोलंदाज घेईल सर्वाधिक बळी!

T20 WC: बुमराह, रबाडा नव्हे 'हा' गोलंदाज घेईल सर्वाधिक बळी! माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने वर्तवला अंदाज T20 World Cup 2021 Brett Lee Predicts Highest Run Getter And Wicket Taker Both Are Indians vjb 91
Clean-Bowled
Clean-Bowled
Updated on

T20 World Cup 2021 मधील पात्रता फेरीचे सामने आणि सराव सामने चांगलेच रंगले. आता २३ ऑक्टोबरपासून टी२० वर्ल्ड कपचे मूळ सामने सुरू होणार आहेत. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. २४ ऑक्टोबरच्या रविवारी हा सामना दुबईत खेळवला जाणार आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी आता सारेच संघ सज्ज झाले आहेत. तशातच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज आणि गोलंदाज कोण असेल? यावर आपलं मत मांडलं.

Clean-Bowled
'टीम इंडिया'ला नावं ठेवणाऱ्या क्रिकेटरकडून चक्क संघाची स्तुती

"यंदाचा टी२० वर्ल्ड कप युएईमध्ये रंगणार आहे. अशा खेळपट्ट्यांवर आतापर्यंतचा इतिहास पाहता आशियाई खंडातील देश अधिक यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे आशियाई देशांमधील खेळाडूंची या स्पर्धेतील कामगिरी अधिक चमकदार होऊ शकेल असा माझा अंदाज आहे. यात आणखी एक बाब म्हणजे नुकताच IPL चा हंगाम पार पडला. या हंगामात विदेशी खेळाडूंचाही समावेश होता. त्यामुळे काही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकन खेळाडूंनाही अशा खेळपट्ट्यांवर यश मिळण्याची शक्यता आहे", असं ब्रेट ली याने सांगितलं.

KL Rahul
KL Rahul

"गेल्या अनेक दिवसांपासून मी पाहतोय की भारताच्या संघाची कामगिरी चांगली होत आहे. भारतीय संघाचे पहिले पाच फलंदाज हे अतिशय चांगल्या फॉर्मात आहेत. त्यासोबतच त्यांच्या गोलंदाजांचीही कामगिरी चांगली होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत केएल राहुल हा स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल असा माझा अंदाज आहे. तसेच, भारताचा मोहम्मद शमी हा स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरण्याची शक्यता आहे",असंही ब्रेट ली याने स्पष्ट केलं.

Mohammed-Shami
Mohammed-Shami

तसेच, सर्वाधिक बळी आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू भारताचा असल्यास त्याचं मला फारसं आश्चर्य वाटणार नाही, असंही मत ब्रेट ली याने व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.