इयॉन मॉर्गन सर्वांत यशस्वी कर्णधार; मोडला हा रेकॉर्ड

Eoin Morgan
Eoin MorganEoin Morgan
Updated on

मुंबई : रेकॉर्ड बनतातच तुटण्यासाठी असे म्हणतात. आजवर क्रिकेटच्या मैदानात अनेक रेकॉर्ड बनले आणि तुटले. तर काहींचे रेकॉर्ड अद्याप तुटलेले नाही. मात्र, ते तुटणारच नाही, असेही नाही. असाच एक रेकॉर्ड इंग्लंड आणि श्रीलंकेमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात तुटला.

इंग्लंड आणि श्रीलंकेमध्ये सोमवारी सामना खेळला गेला. या सामन्यात यष्टिरक्षक जोस बटलरने शतक झळकावले. यंदाच्या टी-२० क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे. याच शतकाच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेचा पराभव केला. याच विजयासह इंग्लंडने सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. यासह कर्णधार इयॉन मॉर्गन हा सर्वाधिक टी-२० सामन्यांमध्ये विजय मिळवणारा कर्णधार ठरला आहे.

Eoin Morgan
अरे बापरे! केसर १ लाख ३५ हजार रुपये किलो

इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने सामना जिंकत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एकूण ४३ विजय संपादित केले आहे. त्याने आजवर ६८ सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी याला मागे टाकले आहे. धोनीने वर्षभरापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

विराट पाचव्या क्रमांकावर

एकीकडे सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान इयॉन मॉर्गनला भेटला आहे तर भारताचा कर्णधार विराट कोहली हा पाचव्या स्थानावर आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने २९ सामने जिंकले आहे. टी-२० विश्वचषकानंतर विराट कर्णधारपद सोडणार आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानचा असगर अफगाण हा ५२ मॅचमध्ये ४२ व एमएस धोनीने ७२ मॅचमध्ये ४२ विजयांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे. पाकिस्तानचा सरफराज अहमद २९ विजयांसह चौथ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.