IND vs PAK पाकिस्तानने इतिहास बदलला! टीम इंडियावर पराभवाची नामुष्की

दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना रंगला आहे.
India vs Pakistan
India vs Pakistansakal media
Updated on

India vs Pakistan, 16th Match : वर्ल्ड कपच्या इतिहासातील पराभवाची मालिका खंडित करत बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने नवा इतिहास रचला. दुबईच्या मैदानात पाकिस्तान संघाने टीम इंडियाला एकहाती पराभूत केले. कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम इंडियाने 151 धावांपर्यंत मजल मारली होती. पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवा या दोघांनीच या धावा करत टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभूत केले. मोहम्मद रिझवानने 55 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने नाबाद 79 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला कर्णधार बाबर आझम 52 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 68 धावा करुन नाबाद राहिला.

किंग कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पाकिस्तानसमोर 152 धावांचे आव्हान ठेवले आहे. आघाडीची फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर कोहलीने पंतच्या साथीने डावाला आकार दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. कोहलीच्या 49 चेंडूतील 57 धावांशिवाय रिषभ पंतने 30 चेंडूत 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर हसन अली 2 शदाब खान आणि हॅरिस रॉफ याने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या गटातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात रंगला आहे. स्पर्धेतील सलामीच्या लढतीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

पाहा लाईव्ह अपडेट्स

पाकिस्तानच्या सलामी जोडीची दमदार सुरुवात, पावर प्लेमध्ये कुटल्या 43 धावा

भुवीच्या पहिल्याच षटकात रिझवानने एक चौकार आणि एक षटकार खेचत 10 धावा घेतल्या

रिझवान आणि बाबरने केली पाकिस्तानच्या डावाला सुरुवात

कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाकिस्तानसमोर आव्हानात्मक धावंसख्या ठेवली आहे.

146-7 : हार्दिक पांड्याला हॅरिस रॉफने 11 धावांवर केले चालते

133-6 : विराट कोहलीच्या खेळीला शाहिन आफ्रिदीने लावला ब्रेक, कोहलीने 49 चंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 57 धावांची मोलाची खेळी केली.

125-5 : रविंद्र जाडेजाच्या रुपात आणखी एक धक्का, टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत, हसन अलीला मिळाले यश

84-4 : रिषभ पंतच्या रुपात भारतीय संघाला चौथा धक्का, पंतने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 30 चेंडूत 39 धावांची उपयुक्त खेळी केलीये

कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी अर्धशतकी भागादारी पूर्ण करत संघाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी मोलाची भागिदारी रचली

31-3 : सुर्यकुमार यादवही माघारी, 8 चेंडूत 1 चौकार आणि एक षटकार खेचून 11 धावा करणाऱ्या सूर्याला हसन अलीने विकेट किपर रिझवानकरवी झेलबाद केले.

6-2 : शाहिन आफ्रिदीचा भेदक मारा, रोहित शर्मा पाठोपाठ लोकेश राहुलला केलं बोल्ड

1-1 : शाहिन आफ्रिदीनं रोहित शर्माला पहिल्या षटकात बाद केलं. त्याला खातेही उघडता आले नाही.

भारताकडून लोकेश राहुल आणि रोहित शर्मा तर पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीनं केली डावाला सुरुवात

India (Playing XI): रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमराह.

Pakistan (Playing XI): बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर झमान, मोहम्मद हाफिझ, शोएब मलिक, असिफ अली, इमाद वासिम, शदाब खान, हसन अली, हरिस रॉफ, शाहिन आफ्रिदी.

बाबर आझमने टॉस जिंकला, पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.