IND vs PAK : पाकिस्तानी भिडूची पत्नी कोहलीची जबऱ्या फॅन
IND vs PAK : पाकिस्तानी भिडूची पत्नी कोहलीची जबऱ्या फॅनesakal

IND vs PAK : पाकिस्तानी भिडूची पत्नी कोहलीची जबऱ्या फॅन

विराट कोहलीचे पाकिस्तानसह जगभरात बरेच फॅन फॉलोइंग
Published on
Summary

विराट कोहलीचे पाकिस्तानसह जगभरात बरेच फॅन फॉलोइंग

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पॉप्युलॅरिटी जगभरात आहे. विराट कोहलीच्या फलंदाजीला आणि त्याच्या खेळाला प्रत्येक क्रिकेट चाहता सलाम करतो. तसेत त्याचे गुड लक्स देखील महिलांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अशात, विराट कोहलीचे पाकिस्तानसह जगभरात बरेच फॅन फॉलोइंग आहेत. प्रत्येकजण त्याच्या शानदार फलंदाजीचा चाहता आहे. विराट कोहलीच्या चाहत्यांच्या यादीत शामिया आरझूचे नावही आहे. शामिया आरझू पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अलीची पत्नी आहे आणि विराट कोहली हा एक फलंदाज म्हणून तिला खूप आवडतो.

IND vs PAK : पाकिस्तानी भिडूची पत्नी कोहलीची जबऱ्या फॅन
T20 World Cup : कोहली नेतृत्वातील 'विराट' कर्तृत्व सिद्ध करेल

भारतातील हरियाणा राज्यातील रहिवासी असलेल्या शामिया आरझूने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीशी लग्न केले होते. काही वर्षांपूर्वी दोघेही दुबईत भेटले आणि एकमेकांसोबत वेळ घालवू लागले. शामिया आरझूने इन्स्टाग्राम सेशनदरम्यान खुलासा केला होता की, विराट कोहली आवडता फलंदाज आहे आणि ती भारतीय कर्णधाराची मोठी चाहती आहे.

IND vs PAK : पाकिस्तानी भिडूची पत्नी कोहलीची जबऱ्या फॅन
IPL 2021 : विराट कोहली RCB ची कॅप्टन्सीही सोडेल?

इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना शामिया आरझूने हा खुलासा केला. एका युजर्सने तिला विचारले की, तुझा आवडता गोलंदाज हसन अली असेल पण आवडता फलंदाज कोण आहे? त्यावर तिने विराट कोहलीचे नाव लिहिले.

IND vs PAK : पाकिस्तानी भिडूची पत्नी कोहलीची जबऱ्या फॅन
आयुष्य किती क्षणभंगुर असते हे त्यामुळे कळले : विराट कोहली

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सायंकाळी दुबई मैदानावर महामुकाबला होऊ शकतो. शामिया आरझूचा पती आणि पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हसन अली देखील या सामन्यात सहभागी होताना दिसू शकतात. पाकिस्तानच्या शेवटच्या 12 खेळाडूंमध्ये त्याची निवड झाली आहे. हसन अलीचा रेकार्ड भारताविरुद्ध काही विशेष नाहीयेय. आशिया चषक 2018 आणि विश्वचषक 2019 च्या लीग स्टेज सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी हसन अलीला पराभूत केले. टी 20 विश्वचषकात भारताचा रेकार्ड पाकिस्तानच्या तुलनेत 100 टक्के आहे. आतापर्यंत 5 सामन्यांमध्ये भारताने प्रत्येक वेळी पाकिस्तानला हरवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.