Video : जेव्हा फलंदाजांसोबत क्षेत्ररक्षकही गोंधळतात

आयर्लंडच्या डावातील अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर फलंदाजांसह क्षेत्ररक्षकांमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
Namibia vs Ireland
Namibia vs Ireland Sakal
Updated on

T20 World Cup 2021 Namibia vs Ireland 11th Match : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पात्रता फेरीतील आयर्लंड आणि नामिबिया यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर सुपर 12 गटातील समीकरण स्पष्ट झाले आहे. नामिबियाने आयर्लंडला पराभूत करत वर्ल्ड कप स्पर्धेत आगेकूच केली आहे. ते सुपर 12 मधील दुसऱ्या गटात खेळताना दिसतील. नामिबिया विरुद्धच्या सामन्यात आयर्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. सुपर 12 स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात आयर्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. आयर्लंडने निर्धारित 20 षटकात 8 बाद 125 धावा केल्या होत्या.

आयर्लंडच्या डावातील अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर फलंदाजांसह क्षेत्ररक्षकांमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या षटकात आयर्लंडकडून सिमी सिंग आणि क्रँग यंग फलंदाजीसाठी क्रिजवर होते. विसेनं ज्यावेळी अखेरचा चेंडू टाकला त्यावेळी सिमी सिंगनं एबी स्टाइल 360 अंशात चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला. त्यात तो अपयशी ठरला. बॅट लागून चेंडू गोलंदाजाच्या दिशेनं गेला. शेवटचा चेंडू असल्यामुळे सिमी धाव घेण्यासाठी क्रिजमधून बाहेर पडला.

Namibia vs Ireland
नामिबीया Super 12 साठी क्वॉलिफाय; भारताच्या गटात झाला समावेश

नॉन स्ट्रायकला असलणाऱ्या क्रॅगने यंगने धाव पूर्णही केली. पण यावेळी ओव्हर थ्रोच्या रुपात या जोडीनं पुन्हा धाव चोरली. यावेळी यंग दुसरी धाव पूर्ण करुन पुन्हा तिसऱ्या धावेस्टा स्ट्राइक एन्डला आला होता. दोघे एकाच क्रिजमध्ये होते. तरी देखील नामिबियाच्या क्षेत्ररक्षकांना त्यांना बाद करता आले नाही.

Namibia vs Ireland
'टीम इंडिया'ला कोणीही हरवू शकतं; नासिर हुसेनचं रोखठोक मत

फलंदाजांच्या गोंधळानंतर क्षेत्रक्षकही गोंधळले आणि जिथे एक धावही निघली नसती तिथे तीन धावा गेल्या. आयसीसीने हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते. नामिबियाने दिलेल्या या अवांतर धावा त्यांना महागात पडल्या नाहीत. त्यांनी दिलेले आव्हान 8 गडी राखून सहज पार केले. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.