Black Lives Matter : गुडघे टेकून क्विंटन डी कॉकनं टाकला वादावर पडदा

दक्षिण आफ्रिकेच्या संघातील खेळाडू 'ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर' मोहिमेला समर्थन देण्यासाठी गुडघ्यावर बसल्याचे पाहायला मिळाले.
Quinton de Kock
Quinton de Kock T20 World Cup 2021 Twitter
Updated on

दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉक Black Lives Matter च्या संदर्भातील मुद्यावरुन चर्चेत आला होता. वेस्ट इंडीज विरुद्धच्या लढतीत गुडघे टेकायला नकार देत क्विंटन डी कॉकने सामन्यातून माघार घेतली होती. शारजाच्या मैदानात खेळाला सुरुवात होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघातील खेळाडू 'ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर' मोहिमेला समर्थन देण्यासाठी गुडघ्यावर बसल्याचे पाहायला मिळाले. यात क्विंटन डी कॉकचाही समावेश होता.

काय होता वाद

वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सर्व खेळाडूंना Black Lives Matter च्या मोहिमेत सहभागी होण्याची सूचना दिली होती. बोर्डाच्या हा निर्णय क्विंटन डी कॉकला पटला नाही. गुडघ्यावर बसण्यास पटत नसल्यामुळे त्याने थेट सामन्यातून माघार घेतली होती. ज्या खेळाडूंना गुडघ्यावर बसायचे नसेल त्याने छातीवर हात ठेवून या मोहिमेला पाठिंबा दर्शवला तरी जालत होते. मात्र टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत गुडघ्यावर बसूनच या मोहिमेचे समर्थन करण्याच्या सूचना दक्षिण आफ्रिका बोर्डाने दिल्या होत्या.

Quinton de Kock
पाक महिला जर्नलिस्टची भज्जीनं घेतली फिरकी

बोर्डाने नाराजी व्यक्त केल्यावर क्विंटन डी कॉकन मागितली होती माफी

डी कॉकने तडकाफडकी निर्णय घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिका बोर्डाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याने आपला निर्णय माघार घेत पुढील सामन्यासाठी मैदानात उतरण्याचे स्पष्ट केले. आपली बाजू मांडताना क्विंटन डी कॉकने सहकाऱ्यांची माफी मागत गुडघे टेकायला तयार असल्याचे म्हटले होते.

Quinton de Kock
श्रीलंकेसमोर आफ्रिकेचा डंका; निसंकाची अर्धशतकी खेळी व्यर्थ

काय आहे ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर?

मागील दिड वर्षांपूर्वी अमेरिकेतील पोलिसांनी कृष्णवर्णीय नागरिक असलेल्या जॉर्ज फ्लॉयड याला एका फसवणूकीच्या प्रकरणात अटक केली होती. पोलिसांच्या मारहाणीत जॉर्ज फ्लॉयडचा मृत्यू झाला होता. 25 मे 2020 मध्ये घडलेल्या या घटनेनंतर जगभरात तीव्र पडसाद उमटले. तेव्हापासून कृष्णवर्णीयांनाही जगण्याचा अधिकार आहे, हे सांगण्याच्या उद्देशाने 'ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर' मोहिमेला सुरुवात झाली आहे. खेळाच्या मैदानातूनही या मोहिमेच्या अंतर्गत जगाला समानतेच्या वागणूकीचा संदेश दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.