नामिबिया विरुद्ध रोहितनं घातली विक्रमाला गवसणी

रोहित आधी विराट गप्टीलनं केली होती अशी कामगिरी
Rohit Sharma
Rohit SharmaAFP
Updated on

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने नामिबिया विरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केलीय. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 3000 धावांचा टप्पा पार केला. 3000 पेक्षा अधिक धावा करणारा तो क्रिकेट जगतातील तिसरा फलंदाज ठरलाय. रोहित शर्मापूर्वी विराट कोहली आणि न्यूझीलंडचा स्टार मार्टिन गप्टिलने तीन हजारीचा टप्पा पार केला आहे. 3000 धावांचा टप्पा पार करणाऱ्या या दोघांच्या पक्तींत आता रोहित शर्माचा समावेश झाला आहे.

Rohit Sharma
टांगेवाल्याची मुलगी ते पद्मश्री; हॉकीच्या राणीची संघर्षमय कहाणी

टी-20 स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा गोलंदाजी करताना नामिबियाच्या संघाला 132 धावांत आटोपले होते. 133 धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या जोडीने भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. रोहित शर्माने 37 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 56 धावा केल्या आहेत. जॅन फ्रायलिंकने रोहितचा खेळ खल्लास केला.

Rohit Sharma
पुढचा कॅप्टन रोहितच; खुद्द कोहलीनं दिले संकेत

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यात दमदार खेळ दावणाऱ्या टीम इंडियाची मुख्य स्पर्धेतील सुरुवात खराब झाली. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडिया अडचणीत आली. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील निकालानंतर भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. भारतीय संघाने दोन सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध पहिला सामना जिंकला होता. स्कॉटलंडनंतर आता नामिबियाला पराभूत करुन भारतीय संघ स्पर्धेची सांगता विजयाने करण्यासाठी मैदानात उतरला आहे.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला नावाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा टीम इंडियाचा टी-20 तील अखेरचा सामना आहे. या सामन्यानंतर रोहित शर्मा संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळताना दिसू शकतो. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी द्रविड विराजमान होईल. तो द्रविडची जागा घेईल. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा खेळणार का? हा उत्सुकतेचा विषय असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.