T 20 World Cup : पर्पल जर्सीचा विजयी धमाका कायम

दोन विजयासह स्कॉटलंडच्या संघाने सुपर 12 गटातील आपला प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.
SCOvPNG
SCOvPNG Sakal
Updated on

Scotland vs Papua New Guinea 5th Match : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील ब गटात स्कॉटलंडने आपला विजयी धमाका कायम ठेवला. पापुआ न्यू गिनी संघाला 17 धावांनी पराभूत करत त्यांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पहिल्या सामन्यात त्यांनी गटातील सर्वात भक्कम समजल्या जाणाऱ्या बांगलादेशला पराभूत केले होते. दोन विजयासह स्कॉटलंडच्या संघाने सुपर 12 गटातील आपला प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.

स्कॉटलंड संघाचा कर्णधार कायले कोएत्झरनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ओमान विरुद्ध एकही विकेट न मिळालेल्या पापुआ न्यू गिनीनं सुरुवातीलाच स्कॉटलंडला धक्के दिले. अवघ्या 22 धावांवर स्कॉटलंड संघाने पहिली विकेट गमावली. मोरयानं कर्णधार कोएत्झरलाही माघारी धाडले. त्यानंतर धावफलकावर अवघ्या 26 धावा असताना सलामीवीर मुन्से मोठी फटकेबाजी करण्याच्या नादात 15 धावा करुन परतला.

SCOvPNG
T 20 WC मधील बेस्ट जर्सी अन् 12 वर्षांच्या डिझायनरची चर्चा

मॅथ्यू क्रॉस 45 आणि रिची बेरिंग्टन यांनी संघाच्या डावाला आकार दिला. तिसऱ्या विकेटसाठी या जोडीने 92 धावांची भागादीर रचली. मॅथ्यू क्रॉस बाद झाल्यानंतर बेरिंग्टनने 49 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 70 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीच्या जोरावर स्कॉटलंडने निर्धारित 20 षटकात 9 बाद 165 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पापुआ न्यू गिनी संघ 19.3 षटकात 148 धावांत आटोपला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()