...म्हणून टीम इंडियानं धोनीला मेंटॉर केलं; पाक क्रिकेटरचा अजब तर्क

भारतीय संघ कागदावर नक्कीच भारी आहे. पण...
Dhoni And Shastri
Dhoni And ShastriSakal
Updated on

T20 WC, IND Vs PAK: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना 24 आक्टोबरला रंगणार आहे. या सामन्यापूर्वी वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही संघ मैदानात भिडण्यापूर्वी मैदानाबाहेर दोन्ही बाजूनं जणू शाब्दिक युद्धालाच सुरुवात झाली आहे. पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटर तन्वीर अहमदने टीम इंडियासंदर्भात मोठे विधान केले आहे. यावेळी भारतीय संघ दबावात आहे. त्यामुळेच त्यांना महेंद्रसिंह धोनीला मेंटॉर म्हणून संघासोबत आणण्याची वेळ आली आहे, असा दावा पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने केलाय.

एका टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात बोलताना तन्वीर अहमद म्हणाला की, भारतीय संघ कागदावर नक्कीच भारी आहे. मागील काही काळापासून संघाने उत्तम कामगिरीही करुन दाखवली आहे. पण गेल्या काही सामन्यात ते संघर्ष करताना दिसले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच मोठ्या दबावात दिसतोय. त्यामुळेच त्याने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले.

Dhoni And Shastri
T20 WC: टीम इंडियाचा 'हा' खेळाडू सामना फिरवू शकतो - लक्ष्मण

तन्वीर अहमद पुढे म्हणाला, या कारणामुळेच टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीला मेंटॉर म्हणून संघासोबत ठेवले आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये नावाला साजेसा खेळ करता आलेला नाही. त्यामळे संघ आणखी दबावात वाटतो, असे तर्क अहमदने लावला आहे. तन्वीर अहमद पाकिस्तानसाठी पाच कसोटी सामने खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात 500 पेक्षा अधिक विकेट्स आहेत.

Dhoni And Shastri
T 20 World Cup : पर्पल जर्सीचा विजयी धमाका कायम

वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे पारडे नेहमीच भारी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कप स्पर्धेतील रेकॉर्ड हे टीम इंडियाच्या बाजूनेच आहे. 2007 पासून रंगणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही संघ पाच वेळा समोरासमोर आले आहेत. यात पाचही वेळा भारतीय संघाने बाजी मारली आहे. पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला साखळी सामन्यासह फायनलमध्ये पराभूत केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()