T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानचा संघ पोहचला सुपर 8 मध्ये; आता भारताला देणार आव्हान

Afghanistan Cricket Team
Afghanistan Cricket Team T20 World Cup 2024esakal
Updated on

AFG vs PNG T20 World Cup 2024 : भारतात मागील वर्षी पार पडलेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडकात दमदार कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तान संघाने टी-२० विश्‍वकरंडकातही आपली धडाकेबाज कामगिरी कायम ठेवली. फझलहक फारूकी, नवीन उल हक यांची प्रभावी गोलंदाजी व गुल्बदीन नेब याच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने शुक्रवारी पहाटे झालेल्या लढतीत पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघावर सात विकेट व २९ चेंडू राखून विजय मिळवला.

या विजयासह अफगाणिस्तान संघाने अव्वल आठ संघांच्या फेरीत प्रवेश केला. या गटातून पुढल्या फेरीत पोहोचणारे दोन संघ निश्‍चित झाले आहेत. अफगाणिस्तानसह यजमान वेस्ट इंडीज संघाने पुढल्या फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तान आता 20 जूनला भारतासोबत भिडणार आहे.

Afghanistan Cricket Team
RSA vs NEP T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेची लाज एका धावेने वाचली; नेपाळविरूद्धच्या सामन्यात झाले खंडीभर विक्रम

पीएनजी संघाचा डाव ९५ धावांमध्ये आटोपला. अफगाणिस्तानने हे आव्हान १५.१ षटकांत तीन फलंदाज गमावत ओलांडले. रहमानुल्लाह गुरबाज (११ धावा) व इब्राहिम झादरन (०) या सलामीवीरांकडून निराशा झाली; पण गुल्बदीन नेब याने ३६ चेंडूंमध्ये नाबाद ४९ धावा फटकावत अफगाणिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मोहम्मद नबी याने नाबाद १६ धावा करीत त्याला साथ दिली.

त्याआधी अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पीएनजीची अवस्था १३व्या षटकांत सात बाद ५० धावा अशी झाली होती. किपलिन दोरिया याने २७ धावांची आणि ॲले नाओ याने १३ धावांची खेळी केल्यामुळे पीएनजी संघाला ९५ धावांपर्यंत मजल मारता आली. फझलहक फारूकी याने १६ धावा देत तीन फलंदाज बाद करीत सामनावीराचा मान संपादन केला. नवीन उल हक याने ४ धावा देत दोन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक : पापुआ न्यू गिनी - १९.५ षटकांत सर्व बाद ९५ धावा (किपलिन दोरिगा २७, ॲले नाओ १३, फझलहक फारूकी ३/१६, नवीन उल हक २/४) पराभूत वि. अफगाणिस्तान - १५.१ षटकांत तीन बाद १०१ धावा (गुल्बदीन नेब नाबाद ४९, मोहम्मद नबी नाबाद १६, सीमो कामिया १/१६).

Afghanistan Cricket Team
RSA vs NEP : नेपाळ जिंकता जिंकता हरली! 1 बॉल 2 धावा हव्या असताना क्लासेनने केलं मोठं काम

सर्वाधिक चेंडू राखून अफगाणचे विजय

७३ वि. आयर्लंड, २०१७

५९ वि. श्रीलंका, २०२२

३२ वि. झिम्बाब्वे, २०१८

२९ वि. पीएनजी, २०२४

१६ वि. अमिराती, २०१५

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.