T20 World Cup 2024: पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार करणार नाही बॉलिंग, जाणून घ्या कारण

Australia Cricket: टी20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सामन्यामध्ये त्यांचा कर्णधार फलंदाजी करणार आहे, मात्र गोलंदाजी करणार नाही, याची पुष्टी मुख्य प्रशिक्षकांनी केली आहे.
Pat Cummins - Mitchell Marsh
Pat Cummins - Mitchell MarshX/cricketcomau
Updated on

Australia Cricket: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला रविवारी (2 जून) सुरुवात होत आहे. तब्बल 20 संघात खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघावरही सर्वांचे लक्ष आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 6 जूनला खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना ओमानविरुद्ध बार्बाडोसमध्ये खेळवला जाईल. दरम्यान, या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा एक धक्का बसला आहे. त्यांचा कर्णधार मिचेल मार्श या सामन्यात केवळ फलंदाजी करताना दिसू शकतो. तो गोलंदाजी करणार नाहीये, याची पुष्टी मुख्य प्रशिक्षक अँड्र्यु मॅकडोनल्ड यांनी केली आहे.

मार्शला आयपीएल 2024 दरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्याबाबतीत ऑस्ट्रेलियाने टी20 वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच जोखीम न घेण्याचे ऑस्ट्रेलियाने ठरवले आहे. कारण त्याच्याकडे आधीच नेतृत्वाची जबाबदारीही आहे.

Pat Cummins - Mitchell Marsh
Sourav Ganguly: 'विराट महान खेळाडू, पण...', गांगुलीचा टी20 वर्ल्ड कपसाठी कोहलीला मोलाचा सल्ला

त्याच्याबाबत मॅकडोनल्ड यांनी सांगितले की 'त्याने सराव सामने स्वत:ला तपासण्यासाठी खेळले आहेत. दुसऱ्या सराव सामन्यात त्याने जास्तवेळ क्षेत्ररक्षणही केले, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असेल. तो पहिला सामना खेळेल, पण गोलंदाजी करणार नाही.'

मार्श टी20 वर्ल्ड कपच्या सराव सामन्यांमध्ये नामिबिया आणि वेस्ट इंडिज या संघांविरुद्ध खेळला. या सराव सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे 18 आणि 4 धावा केल्या.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने आयपीएल खेळलेल्या काही खेळाडूंना छोटी सुटी दिली होती. त्यामुळे पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, कॅमेरॉन ग्रीन आणि ट्रेविस हेड हे 31 मे पर्यंत वेस्ट इंडिजपर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने क्षेत्ररक्षणासाठी सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना मैदानात उतरवले होते.

Pat Cummins - Mitchell Marsh
IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

याबाबत मॅकडोनल्ड म्हणाले, 'आम्हला माहित होते की 1 जूनच्या आधी संपूर्ण संघ एकत्र येणार नाही. ओमानच्या सामन्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान बरेच अंतर आहे. हे सर्व खेळाडू एकत्र खूप खेळले आहेत आणि त्यांना पुन्हा मिसळून जाण्यात फार वेळ लागणार नाही.'

ऑस्ट्रेलियाला 6 जूनला पहिला सामना खेळल्यानंतर 8 जूनला इंग्लंडविरुद्धचा सामना खेळायचा आहे. 6 जूनचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजता होणार आहे, तर इंग्लंडविरुद्धचा सामना रात्री 10.30 वाजता सुरु होणार आहे.

त्यानंतर 12 जूनला ऑस्ट्रेलिया नामिबियाविरुद्ध सामना खेळणार आहे, तर 16 जूनला स्कॉटलंड विरुद्ध सामना खेळणार आहे. नामिबिया आणि स्कॉटलंड यांच्याविरुद्धचे सामने सकाळी 6 वाजता सुरु होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.