T20 WC 2024 : 'एक छोटी चूक पडली महागात...' सुपर-8 मध्ये पोहोचताच संघाच्या खेळाडूवर ICCने केली कारवाई

22 जून रोजी होणार भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना
T20 World Cup 2024 Bangladesh Super 8
T20 World Cup 2024 Bangladesh Super 8sakal
Updated on

T20 World Cup 2024 Bangladesh Super 8 : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने शेवटच्या साखळी सामन्यात नेपाळला पराभूत करून सुपर-8 मध्ये आपले स्थान पक्के केले होते. या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बांगलादेशी खेळाडूवर कारवाई केली आहे. खरंतर हा खेळाडू आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला होता. त्यानंतरच आयसीसीने या खेळाडूवर ही कारवाई केली आहे.

T20 World Cup 2024 Bangladesh Super 8
Ind vs Afg Super-8 : पावसामुळे भारत-अफगाण सामना रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? काय आहे सुपर-8चा नियम

खरंतर,टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने शेवटचा साखळी सामना नेपाळसोबत खेळला होता. या मॅचमध्ये तंझीमने बॉलिंग करत असताना नेपाळचा कर्णधार आणि बॅट्समन रोहितच्या विरोधात आक्रमक वृत्ती दाखवली होती, याशिवाय तो रागाच्या भरात रोहितच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला होता. ज्यानंतर तंजीम हसन साकिबला ICC आचारसंहितेच्या कलम 2.12 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले.

T20 World Cup 2024 Bangladesh Super 8
Gautam Gambhir : क्रिकेटपटू, खासदार अन् आता हेड कोच! BCCI किती देणार पगार? जाणून घ्या गौतम गंभीरची संपत्ती

त्यामुळे तंजीमला मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय आता तंजीमला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. सामना संपल्यानंतर तंजीमने मैदानावर केलेल्या गुन्ह्याची कबुलीही दिली.

बांगलादेशचा संघ आता सुपर-8 मध्ये खेळताना दिसणार आहे. बांगलादेशचा सुपर-8मधला पहिला सामना 20 जूनला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यानंतर 22 जून रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.