T20 World Cup: अमेरिकेत सामने म्हणजे दुरून डोंगर साजरे...

Cricket in America: अमेरिकेत टी२० वर्ल्ड कप म्हणजे मजा असं वाटत असतानाच प्रत्यक्षात चित्र कठीण दिसत आहे.
Nassau County International Cricket Stadium
Nassau County International Cricket StadiumSakal
Updated on

T20 World Cup: अमेरिका आणि कॅरेबीयन बेटांवर टी-२० वर्ल्डकप म्हणजे मजाच, अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत असताना. प्रत्यक्षात चित्र कठीण आहे. अमेरिकेत येणे आणि खेळणे.

आयसीसीने व्यवस्था चांगली करायचा प्रयत्न केला आहे. ज्याला अमेरिकन क्रिकेट संघटनेने जोरदार साथ दिली आहे. तरीही बरीच गैरसोय खेळाडू आणि प्रेक्षकांना अमेरिकेत स्पर्धेदरम्यान सहन करावी लागणार आहे.

स्पर्धेच्या वेळापत्रकावर नजर टाकली तर भारताचे तीन साखळी सामने न्यूयॉर्क शहरात असल्याचे दिसतील. प्रत्यक्षात न्यूयॉर्क शहरापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या लाँग आयलंड भागातील नासाऊ कौटी प्रभागातील आयसेनहॉवर पार्कमध्ये उभारलेल्या मैदानावर सामने रंग भरणार आहेत.

Nassau County International Cricket Stadium
T20 World Cup 2024 : इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्डकप विजेत्या संघाला मिळणार 'इतके' कोटी

न्यूयॉर्क शहराच्या मध्य भागातील पेन किंवा सेंट्रल स्टेशनवरून लोकल ट्रेन पकडून वेस्टबरी स्टेशनचा प्रवास जवळपास १ तासाचा आहे. तिथून बसने २० मिनिटांवर उतरून मग २० मिनिटे चालत गेल्यावर प्रेक्षकांना मैदानाचे प्रवेशद्वार दिसणार आहे.

भारतीय संघाची राहाण्याची सोय मैदानाच्या जवळ म्हणजे ७ किलोमीटर अंतरावर केली गेली आहे. श्रीलंकन संघाची सोय ब्रुकलीन भागात केली आहे, जे मैदानापासून दीड तासाच्या अंतरावर आहे.

भारतीय संघाचे हॉटेल मस्त आहे, तर श्रीलंकन संघाचे त्या मानाने सामान्य आहे. भारतीय संघाला तीन सलग सामने न्यूयॉर्क येथे देण्यात आले आहेत, तर श्रीलंकन संघ चार सामने चार मैदानांवर खेळण्यासाठी चांगलेच फिरणार आहे.

स्पर्धेदरम्यान घातपात करायचा इशारा कोणीतरी दिला असल्याने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याच्या प्रयत्नात इतके काही करून ठेवले आहे की मैदानात आपल्या जागेवर जायला भरपूर कसरत करावी लागत आहे.

Nassau County International Cricket Stadium
T20 World Cup : गतविजेता इंग्लंड विजयी सलामीसाठी सज्ज! स्कॉटलंडकडून धक्कादायक निकालाची अपेक्षा

स्टेडियम जवळच्या लाँग आयलंड भागात मोजकी चांगली हॉटेल्स आहेत, जी खूप अगोदर आरक्षित केली गेली आहेत. परिणामी पत्रकारांना लांब राहून रोजचा प्रवास करून मैदानावर पोहोचावे लागणार आहे किंवा चढ्या भावाने स्थानिक भागातील घरात पाहुणे म्हणून रहावे लागणार आहे.

३५ हजार क्षमतेच्या मैदानात सोमवारच्या श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिका सामन्याला १० हजारपेक्षा कमी प्रेक्षक हजर झाले होते. संयोजकांची तरीही व्यवस्था करताना थोडी तारांबळ उडत होती.

५ जूनला भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध सामना खेळेल तेव्हा भरपूर प्रेक्षक मैदानात हजेरी लावतील आणि ९ जूनला भारत वि. पाकिस्तान सामन्याला प्रेक्षागृह खचाखच भरलेले असेल, तेव्हा संयोजकांची काय तारांबळ उडेल याचा विचार केलेला बरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.