T20 World Cup 2024 Final, India vs South Africa: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात अंतिम सामना शनिवारी (२९ जून) होत आहे. बार्बाडोसमध्ये होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात बाद धावा केल्या.
भारताने सुरुवातीला मोठ्या विकेट्स गमावल्यानंतरही विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरला. पण अक्षर पटेल ३१ चेंडूत ४७ धावांची शानदार खेळी करून बाद झाल्यानंतर शिवम दुबे फलंदाजीला उतरला. दुबेने फलंदाजीला आल्यानंतर धावांची गती कमी होणार नाही याची काळजी घेतली.
विशेष म्हणजे त्याच्यावर या अंतिम सामन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. आयपीएल २०२४ मध्ये दुबेने केलेल्या शानदार कामगिरीनंतर त्याला टी२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात संधी मिळाली होती. त्याला भारतीय संघव्यवस्थापनाने या वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सामन्यापासून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीही दिली.
मात्र, त्याला पहिल्या ७ सामन्यांत खास काही करता आले नाही. त्याने ७ सामन्यांत मिळून फक्त १०६ धावा केल्या होत्या. मात्र अंतिम सामन्यात त्याने आपल्या बॅटची ताकद दाखवली. याबरोबरच भारतीय संघाचा त्याच्यावरील विश्वासही सार्थ ठरवला.
तो जेव्हा फलंदाजीला आला, त्यावेळी विराटला खंबीरपणे साथ देणारं कोणीतरी हवं होतं. दुबेने ही जबाबदारी सांभाळली. त्याने आक्रमक खेळताना ३ चौकार आणि १ षटकारासह २७ धावांची खेळी केली.
अखेरच्या षटकात तो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. मात्र, त्याच्या २७ धावा अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. कारण जर त्याने त्यावेळीही आपली विकेट गमावली असती, तर कदाचीत भारतीय संघ १७० धावांचा टप्पा पार करू शकला नसता. तो ज्या परिस्थितीत फलंदाजीला आला, त्यापरिस्थितीत त्याच्या २७ धावांच्या खेळीही महत्त्वाची ठरली.
या सामन्यात भारताकडून केवळ तीन फलंदाजांनी दोन आकडी धावा पार केल्या. दुबे आणि अक्षर यांच्याव्यतिरिक्त विराट कोहलीने ५९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि एन्रिच नॉर्किया यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच मार्को यान्सिन आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.