T20 World Cup 2024: भारत-इंग्लंड सेमीफायनलमध्ये पावसाने बॅटिंग केल्यास फायनलचं तिकीट कोणाला?

T20 World Cup 2024 Semi-Final: टी20 वर्ल्ड कप 2024 मधील सेमीफायनलचे सामने जर पावसामुळे रद्द झाले, तर कोणत्या संघाला अंतिम सामन्यात स्थान दिले जाणार, जाणून घ्या.
T20 World Cup Semi - Final
T20 World Cup Semi - FinalSakal
Updated on

T20 World Cup 2024 Semi-Final Weather: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा आता अखेरच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेतील अंतिम 4 संघ निश्चित झाले असून आता उपांत्य फेरीचे सामने गुरुवारी (27 जून) खेळले जाणार आहेत.

उपांत्य फेरीतील पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तौरोबाला होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 27 जून रोजी पहाटे 6 वाजता सुरू होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघात गयानाला रंगेल. हा सामनाही २७ रोजीच भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे.

दरम्यान, कॅरेबियन बेटांवर सध्या पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातही दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता कमी आहे.

परंतु, इंग्लंड विरुद्ध भारत सामन्यादरम्यान पावसाची दाट शक्यता असल्याचे अंदाज आहेत. त्यामुळ जर पावसामुळे उपांत्य फेरीतील सामने रद्द झाले, तर अंतिम सामन्यात कोण पोहचणार, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

T20 World Cup Semi - Final
Ind vs Eng : इंग्लंडविरुद्ध भारताच्या Playing-11मधून स्टार ऑलराउंडरचा पत्ता कट; 'या' पठ्ठ्याला मिळणार संधी?

राखीव दिवस आहे का?

महत्त्वाची गोष्ट अशी की दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार जरी गुरुवारी पहाटे 6 वाजता होणार असला, तरी स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री 8.30 वाजता चालू होणार आहे.

तसेच भारत विरुद्ध इंग्लंड सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार जरी गुरुवारी रात्री ८ वाजता चालू होणार असला, तरी स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सकाळी 10.30 वाजता चालू होणार आहे.

त्यामुळे या गोष्टी लक्षात घेता पहिल्या उपांत्य सामन्याला म्हणजेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघात होणाऱ्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. कारण अंतिम सामना शनिवारी होणार असल्याने त्यांच्यासाठी गुरुवार हा राखीव दिवस असेल.

परंतु, भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामनाच स्थानिक वेळेनुसार गुरुवारी होत आहे, त्यामुळे जर त्यांच्यासाठी राखीव दिवस शुक्रवार ठेवला, तर लगेचच शनिवारी अंतिम सामना बार्बाडोसला आहे. त्यामुळेच प्रवास आणि वेळ यांचा ताळमेळ साधणं शक्य होणार नसल्याने दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. पण ज्यादाचा वेळ वाढवण्यात आला आहे.

T20 World Cup Semi - Final
T20 World Cup 2024: '...माझ्या डोळ्यात पाणी आलं', गुलबदिन नैबच्या क्रॅम्पवर काय म्हणाला ऑस्ट्रेलियन कर्णधार?

जर सामना रद्द झाला, तर...

राखीव दिवशीही सामना पूर्ण न झाल्यास रद्द होऊ शकतो. दरम्यान, नियमानुसार उपांत्य फेरीतील कोणताही सामना रद्द झाल्यास ग्रुप स्टेजमध्ये ज्या संघाची क्रमवारी उच्च असेल, तो संघ अंतिम सामन्यात धडक मारेल.

म्हणजेच जर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना रद्द झाला, तर दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात जाईल. कारण सुपर-8 फेरीत दक्षिण आफ्रिका बी ग्रुपमध्ये अव्वल क्रमांकावर होते, तर अफगाणिस्तान ए ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते.

त्याचप्रमाणे जर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना रद्द झाला, तर ए ग्रुपमध्ये अव्वल क्रमांकावर असल्याने भारत अंतिम सामन्यात जाईल, तर बी ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या इंग्लंडचे आव्हान संपेल.

Chitra smaran:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.