Video : 'काय करतोयस यार...' रोहित शर्माची स्टंप माइक रेकॉर्डिंग पुन्हा व्हायरल, आता कोणावर भडकला कॅप्टन?

T20 World Cup 2024 IND vs BAN : टी-20 वर्ल्ड कपमध्ये 22 जून रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात सुपर-8 सामना खेळला गेला.
t20 world cup 2024 ind vs ban rohit sharma stump mic viral video
t20 world cup 2024 ind vs ban rohit sharma stump mic viral videosakal
Updated on

T20 World Cup 2024 IND vs BAN : टी-20 वर्ल्ड कपमध्ये 22 जून रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात सुपर-8 सामना खेळला गेला. हा सामना 50 धावांनी जिंकून टीम इंडियाने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. या सामन्यात टीम इंडिया गोलंदाजी करत असतानाचा कर्णधार रोहित शर्माचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. कुलदीप यादव गोलंदाजी करत असताना रोहितने त्याला काहीतरी सांगितले जे स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

t20 world cup 2024 ind vs ban rohit sharma stump mic viral video
Pat Cummins hat-trick : टी-20 वर्ल्ड कपमध्ये उडाली खळबळ! पॅट कमिन्सने पुन्हा रचला इतिहास; घेतली बॅक टू बॅक 'हॅट्ट्रिक'

काय म्हणाला रोहित शर्मा?

खरंतर, हार्दिक पांड्याने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिले होती. कर्णधार रोहितने कुलदीप यादवच्या हातात बॉल दिला. तेव्हा रोहित म्हणाला की, काय करतोस यार, त्याला बॉल मारू दे. तो आताच आला आहे. रोहितच्या या व्हिडीओवर चाहतेही खूप मजेशीर कमेंट करत आहेत.

एका यूजरने कमेंट करत लिहिले की, भाई, बांगलादेशी खेळाडूंना हिंदी येते. अनेकदा सामन्यादरम्यान रोहित शर्माचे स्टंप माइक रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होते. रोहितचा असा व्हिडिओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेदरम्यान स्टंप माइकमध्ये रोहितचा आवाज रेकॉर्ड झाला होता आणि नंतर तो व्हायरलही झाला होता.

t20 world cup 2024 ind vs ban rohit sharma stump mic viral video
T20 World Cup 2024 : टीम इंडियाच्या विजयाने बदलले उपांत्य फेरीचे समीकरण, 2 संघांवर धोक्याची घंटा

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 196 धावा केल्या होत्या. भारताकडून फलंदाजी करताना उपकर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक नाबाद 50 धावांची खेळी खेळली. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 146 धावा करता आल्या. भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय जसप्रीत बुमराहने 2 बळी घेतले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.