IND vs BAN, Video: ऋषभ पंतला मिळालं नवं टोपन नाव, फिल्डिंग मेडल सोहळ्यात दिग्गज विव रिचर्ड्सनेच केलं जाहीर

Fielding Medal: टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या सुपर-8 च्या सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये फिल्डिंग मेडल सर विवियन रिचर्ड्स यांच्या हस्ते देण्यात आले.
Rishabh Pant | Sir Viv Richards
Rishabh Pant | Sir Viv RichardsSakal
Updated on

Sir Viv Richards praised Rishabh Pant: भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या सुपर-८मधील सामन्यात शनिवारी (२२ जून) बांगलादेशला ५० धावांनी पराभूत केले. अँटिग्वामधील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर हा सामना झाला.

दरम्यान सामन्यानंतर प्रथेप्रमाणे भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला फिल्डिंग मेडल देण्याचा सोहळा रंगला. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

वनडे वर्ल्ड कप २०२३ पासून ही प्रथा सुरू झाली आहे. दरम्यान, बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी आधी संघातील खेळाडूंचे कौतुक केले.

त्यानंतर त्यांनी सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि अक्षर पटेल यांना फिल्डिंग मेडल जिंकण्यासाठी उमेदवार म्हणून घोषित केले. यावेळी या तिन्ही खेळाडूंनी केलेल्या चांगल्या क्षेत्ररक्षणाचे कौतुकही केले.

Rishabh Pant | Sir Viv Richards
T20 World Cup: अन् तिथेच इंग्लंडने मॅच गमावली, पाहा द. आफ्रिकेच्या कर्णधाराने मागे पळत येत पकडलेला अविश्वसनीय कॅच

त्यानंतर त्यांनी वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स यांना हे मेडल विजेत्या खेळाडूला देण्यासाठी आमंत्रित केले. रिचर्ड्स ड्रेसिंग रुममध्ये येत असताना सर्व खेळाडू उठून उभे राहिले आणि त्यांनी रिचर्ड्स यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करत त्यांना सन्मान दिला. यानंतर टी दिलीप आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने रिचर्ड्स यांचे स्वागत केले.

त्यावेळी रिचर्ड्स यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून सूर्यकुमारच्या गळ्यात ते मेडल घातले. त्यांनी यानंतर भारतीय संघाला संदेशही दिला.

ते म्हणाले, 'आज चांगली कामगिरी झाली, जो संघ आधीच शक्तीशाली आहे, त्यांना मी काय सांगणार? तुम्ही चांगली कामगिरी करत आहात. मी फक्त इतके सांगेल की जर वेस्ट इंडिजने विजेतेपद मिळवण्यात अपयशी झाले, तर मी तुम्हाला पाठिंबा देईल, असं चालेल ना?'

Rishabh Pant | Sir Viv Richards
IND vs AFG: द्रविडने दिलं फिल्डिंग मेडल अन् जडेजानं थेट उचलूनच घेतलं, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील BTS Video पाहिला का?

ऋषभ पंतला दिलं नवं टोपन नाव

तसेच त्यांनी ऋषभ पंतने अपघातानंतर केलेल्या पुनरागमनाबद्दलही त्याचे कौतुक केले. ते म्हणाले, 'पंत तू ज्या गोष्टीतून गेला, त्यानंतर तुला परत पाहून खूप छान वाटले. तू भविष्यात जे काही करणार आहे, त्याला आम्ही गमावलं असतं. पण तुला आता परत आलेलं पाहून चांगलं वाटलं आणि तू ज्याप्रकारे तुझं क्रिकेट खेळत आहे, त्याचा आनंद घेत आहे.'

यानंतर पंत रिचर्ड्स यांना भेटला, तेव्हा त्यांनी त्याला 'पॉकेट रॉकेट' अशा नावानं संबोधलं. त्यांनी पंतला दिलेलं हे नाव ऐकून सर्वच हसायलाही लागले.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १९६ धावा केल्या. त्यानंतर १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला २० षटकात ८ बाद १४६ धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.