Hardik Pandya: IPL मध्ये फेल झालेला हार्दिक वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात चमकला, पाहा कशा घेतल्या तीन विकेट्स

T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कपमधील भारताच्या पहिल्याच सामन्यात उपकर्णधार हार्दिक पांड्याने गोलंदाजीत चमकदार कामगिरी करताना तीन विकेट्स घेतल्या.
Hardik Pandya | India vs Ireland | T20 World Cup
Hardik Pandya | India vs Ireland | T20 World CupSakal
Updated on

India vs Ireland, T20 World Cup: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत आणि आयर्लंड संघात बुधवारी न्युयॉर्कला सामना झाला. या सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यातही उपकर्णधार हार्दिक पांड्याची कामगिरी विशेष उल्लेखनीय राहिली.

टी२० वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या आयपीएल 2024 मध्ये हार्दिकची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. हार्दिकने आयपीएल 2024 मध्ये 14 सामन्यांमध्ये 216 धावा केल्या होत्या, तसेच 11 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तो वर्ल्ड कपमध्ये कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

दरम्यान, पहिल्याच सामन्यात हार्दिकने गोलंदाजीत चमक दाखवली आहे. त्याने 4 षटकात गोलंदाजी करताना 27 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. त्याने 1 षटक निर्धावही टाकले.

Hardik Pandya | India vs Ireland | T20 World Cup
Mohammed Shami: टीम इंडियात लवकरच होणार मॅच विनर गोलंदाजाचं पुनरागमन; सर्जरीनंतर जोरदार सरावाला सुरुवात; Video Viral

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहितने हार्दिकला पॉवरप्लेनंतर सातव्या षटकात गोलंदाजीसाठी आणले.

हार्दिकने त्याच्या पहिल्याच षटकात हार्दिकने आधी हॅरी टेक्टरला माघारी धाडले. त्याने टाकलेल्या सहाव्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर टेक्टर 10 धावांवर त्रिफळाचीत झाला.

त्यानंतर 9 व्या षटकात पुन्हा हार्दिक गोलंदाजीसाठी आला. त्याने या षटकाचा शेवटचा चेंडू हार्दिकने आऊटसाईड ऑफला टाकलेला, ज्यावर कर्टिस कॅम्फर शॉट खेळताना चुकला आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेत मागे गेला. यावेळी यष्टीरक्षक ऋषभ पंतने चूक न करता झेल घेतला.

Hardik Pandya | India vs Ireland | T20 World Cup
T20 World Cup: टॉस होताच शिक्कामोर्तब झालं! रोहित शर्मासह 'हा' खेळाडू आयर्लंडविरुद्ध करणार सलामीला फलंदाजी

यानंतर 11 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने मार्क एडेअरला बाद केलं. त्याच्या गोलंदाजीवर एडेअरचा झेल शिवम दुबेने घेतला. त्यामुळे हार्दिकला ही तिसरी विकेट मिळाली. त्याने टाकलेले 11 वे षटक निर्धाव देखील ठरले. यानंतर हार्दिकने टाकलेल्या 13 व्या षटकात मात्र त्याला विकेट घेता आली नाही.

दरम्यान, हार्दिकची ही कामगिरी भारताच्या आशा उंचावणारी आहे. कारण हार्दिक हा अष्टपैलू खेळाडू असल्याने तो जर गोलंदाजीतही लयीत असले, तर भारताला पूर्णवेळ गोलंदाज म्हणूनही त्याच्या रुपात एक चांगला पर्याय उपलब्ध राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.