Ind vs Sa Final : दिल नहीं तोडना रोहित भाई… यंदा डोळ्यात अश्रू हवेत पण आनंदाचे! टीम इंडिया 11 वर्षात हरला 5 वेळा फायनल

टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाने इंग्लंडला हरवून अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. उद्या भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. या सामन्यात भारतासमोर 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान असेल.
t20 world cup 2024 ind vs sa final match
t20 world cup 2024 ind vs sa final matchsakal
Updated on

Team India History ICC Trophy Final : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाने इंग्लंडला हरवून अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. उद्या भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. या सामन्यात भारतासमोर 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान असेल.

भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला. त्यानंतर भारताने 5 वेळा आयसीसी स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली आहे, परंतु त्या सर्वांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता रोहित शर्माकडे भारताच्या सर्व जखमा भरून काढण्याची आणि संपूर्ण देशाला विजयाची भेट देण्याची संधी आहे.

t20 world cup 2024 ind vs sa final match
IND vs ENG : 'वर्ल्ड कपमधील सामने भारतीय संघाच्या मर्जीनुसार...' इंग्लंडच्या माजी कर्णधाराने ICCवर केला भेदभावाचा आरोप

टी-20 वर्ल्ड कप 2014

टी-20 वर्ल्ड कप 2007 चा चॅम्पियन असलेला भारतीय संघ 2014 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता. येथे भारताचा सामना श्रीलंकेच्या संघाशी झाला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने 20 षटकात 4 गडी गमावून 130 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने 17.5 षटकांत 4 गडी गमावून 134 धावा केल्या आणि अंतिम फेरीत भारताचा 6 गडी राखून पराभव केला.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2017

चॅम्पियन ट्रॉफी 2017 मध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी झाला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना पाकिस्तानने 50 षटकांत 4 गडी गमावून 338 धावा केल्या होत्या. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला भारतीय संघ 30.3 षटकात 158 धावांवर ऑआऊट झाला. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 180 धावांच्या फरकाने पराभव केला.

t20 world cup 2024 ind vs sa final match
IND vs ENG: 'विराटने त्याचा फॉर्म फायनलसाठी ठेवलाय...' सतत फ्लॉप ठरणाऱ्या कोहलीबाबत कर्णधार रोहितचे मोठे वक्तव्य

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021

2021 मध्ये प्रथमच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. भारताने पहिल्या डावात 217 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 249 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताने 170 धावा केल्या आणि न्यूझीलंडने 2 गडी गमावून 140 धावा करून सामना जिंकला. भारताचा हा अंतिम सामना 8 विकेटने हरला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023

गेल्या वर्षी झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने पुन्हा एकदा मजल मारली होती. यावेळी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होता. येथे भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात भारताचा डाव 296 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 270 धावा करून डाव घोषित केला. यानंतर भारत 234 धावांवर ऑलआऊट झाला आणि ऑस्ट्रेलियाने 209 धावांच्या फरकाने सामना जिंकला.

t20 world cup 2024 ind vs sa final match
IND Vs ENG : टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर रोहित शर्माचे डोळे पाणवले! मग कोहलीने असं काय केलं की.... VIDEO व्हायरल

एकदिवसीय वर्ल्ड कप 2023

गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने प्रवेश केला होता. यावेळी पुन्हा भारतासमोर ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान होते. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि भारताने प्रथम खेळताना 50 षटकात 240 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने 43 षटकात 4 गडी गमावून 241 धावा केल्या आणि 42 चेंडू बाकी असताना 6 विकेट राखून विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.