IND vs SA Final: द. आफ्रिकेच्या महाराजचा भारताला दे धक्का! एकाच षटकात रोहित-पंतला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता, पाहा Video

T20 World Cup 2024 Final: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने रोहित शर्मा आणि ऋषभ पंतला बाद करत सुरुवातीलाच मोठा धक्का दिला
South Africa
South AfricaInstagram/ICC

T20 World Cup 2024 Final, India vs South Africa: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होत आहे. बार्बाडोसला होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरला.

भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी सुरुवात चांगली केली होती. पहिल्याच षटकात आक्रमक पवित्रा त्यांनी अवलंबला होता. मात्र, दुसऱ्या षटकात भारताला मोठे धक्के बसले. दक्षिण आफ्रिकेकडून दुसरे षटक टाकण्यासाठी केशव महाराज आला.

भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांना केशव महाराजने दुसऱ्या षटकात बाद केलं.

South Africa
T20 World Cup 2024: ऑलराऊंडरची ताकद ते सांघिक कामगिरी... 'या' 3 कारणांमुळे टीम इंडिया जिंकू शकते वर्ल्ड कप

केशव महाराज पहिल्या दोन चेंडूवर रोहितने सलग दोन चौकार मारले. त्यानंतर महाराजने चांगले पुनरागमन केले. त्याने चौथ्या चेंडूवर रोहितला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. रोहितचा झेल हेन्रिक क्लासेनने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला घेतला. त्यामुळे रोहितला ९ धावांवर बाद व्हावे लागले.

त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर ऋषभ पंत उतरला. मात्र त्यालाही फार वेळ महाराजने टिकू दिले नाही. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पंतने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो चूकला आणि चेंडू त्याच्या बॅटला लागून वर उडाला. त्यामुळे त्याचा सोपा झेल यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने घेतला. पंतला एकही धाव करता आली नाही.

South Africa
T20 World Cup: आऊट ऑफ फॉर्म पांड्या, चार स्पिनर अन् रिंकूवर अन्याय... सगळ्या टीका सहन करत आगरकरने रोहितला दिली चॅम्पियन टीम

इतकेच नाही, तर पाचव्या षटकात कागिसो रबाडाने सूर्यकुमार यादवला ३ धावांवर बाद केले. त्याचाही झेल क्लासेनने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला घेतला. त्यामुळे ३४ चेंडूत ३ बाद अशी भारताची अवस्था होती.

अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

  • दक्षिण आफ्रिका - क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिझा हेंड्रिक्स, एडेन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यान्सिन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एन्रिक नॉर्किया, तब्राईझ शाम्सी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com