Sachin Tendulkar : मित्रा वर्तुळ पूर्ण झालं...! वर्ल्ड कप जिंकल्यावर क्रिकेटच्या देवाचा राहुल द्रविडसाठी भावूक मेसेज

Sachin Tendulkar on Rahul Dravid : अनेकवेळा भारतीय संघ कधी उपांत्य फेरीत तर कधी अंतिम फेरीत हारला. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतीय चाहत्यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले.
Sachin Tendulkar on Rahul Dravid
Sachin Tendulkar on Rahul Dravidsakal
Updated on

भारतीय संघ 11 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीची वाट पाहत होता. या संघाला 17 वर्षांपासून टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. यादरम्यान अनेकवेळा भारतीय संघ कधी उपांत्य फेरीत तर कधी अंतिम फेरीत हारला. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतीय चाहत्यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले.

भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत ट्रॉफी जिंकली. दरम्यान महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही टीम इंडियाच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. सचिनने भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि त्याचा सहकारी राहुल द्रविड यांच्यासाठी खास संदेशही लिहिला.

Sachin Tendulkar on Rahul Dravid
Hardik Pandya : 'आपण त्यांना मिस करू, पण...' रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याचे मोठे वक्तव्य

सचिन तेंडुलकरने X वर लिहिले की, टीम इंडियाच्या जर्सीत असलेला प्रत्येक स्टार खेळाडूने आपल्या देशातील मुलांना त्यांच्या स्वप्नांच्या एक पाऊल पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली आहे. वर्ल्ड कपच्या रूपाने भारताला चौथा स्टार मिळाला. टी-20 वर्ल्डकपच्या रूपाने आम्हाला दुसरा स्टार मिळाला.

तेंडुलकरने पुढे लिहिले की, वेस्ट इंडिजमध्ये भारतीय क्रिकेटसाठी आयुष्य एक वर्तुळ बनले आहे. 2007 एकदिवसीय वर्ल्ड कपतील आमच्या सर्वात वाईट कामगिरीपासून ते क्रिकेट महासत्ता बनण्यापर्यंत आणि 2024 मध्ये T20WC जिंकण्यापर्यंत… माझा मित्र राहुल द्रविडसाठी खूप आनंद झाला, जो 2011 वर्ल्ड कप जिंकू शकला नाही, परंतु हा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यात त्याचे योगदान आहे प्रचंड. मी त्यांच्यासाठी खूप आनंदी आहे.

Sachin Tendulkar on Rahul Dravid
IND VS SA : 'हा' निरोप दीर्घकाळ स्मरणात राहील! रोहित, कोहली अन् राहुल द्रविड यांच्या एका युगाचा अंत....

रोहित शर्मा- विराट कोहलीसाठी लिहिला खास संदेश

तेंडुलकरने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची स्तुती करताना बॅलड्स वाचल्या. त्याने लिहिले की, रोहितबद्दल कोणी काय म्हणेल? उत्तम कर्णधार! 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील पराभवाला मागे टाकणे आणि सर्व खेळाडूंना टी-20 वर्ल्ड कपसाठी प्रेरित करणे हे कौतुकास्पद आहे. जसप्रीत बुमराहचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार तसेच विराट कोहलीचा सामनावीर पुरस्कार हे दोघेही पात्र आहेत. गरज पडली तेव्हा त्याने चमकदार कामगिरी केली.

सचिन तेंडुलकरने पुढे लिहिले- राहुलसोबत पारस म्हांबरे आणि विक्रम राठोड यांनीही 1996 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 1996 च्या या वर्गाच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाची इतकी चांगली कामगिरी पाहणे आश्चर्यकारक होते. सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि बीसीसीआयचे हार्दिक अभिनंदन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.