T20 World Cup, IND vs AFG: सूर्यकुमार रैनाला टाकणार मागे? कर्णधार रोहितलाही इतिहास रचण्याची संधी

T20 World Cup 2024: भारतीय संघ टी20 वर्ल्ड कपमधील सुपर-8 मधील अफगाणिस्तानविरुद्धचा सामना गुरुवारी खेळणार असून या सामन्यावेळी सूर्यकुमार यादव, विराट कोहली, रोहित शर्मा यांना विक्रम करण्याची संधी आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavSakal

Suryakumar Yadav, Rohit Sharma, Virat Kohli Record: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिली फेरी संपून आता सुपर-8 मधील सामने सुरू झाले आहेत. यातील भारताचा सुपर-8 मधील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध गुरुवारी (20 जून) खेळवला जाणार आहे.

हा सामना बार्बाडोसमधील केन्सिंगटन ओव्हल, ब्रिजटाऊन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यात सूर्यकुमार यादव, विराट कोहली, रोहित शर्मा यांना विक्रमाची संधी आहे.

Suryakumar Yadav
Team India Schedule: टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर! 'या' दिवशी रंगणार पुणे, मुंबई अन् नागपूरमध्ये महत्त्वाचे सामने

सूर्यकुमार टाकू शकतो सुरेश रैनाला मागे

भारताचा धडाकेबाज टी20 क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवला सुरेश रैनाच्या एका विक्रमाला मागे टाकण्याची संधी आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने 6 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो रैनाला मागे टाकत वेस्ट इंडिजमध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरेल.

सध्या रैना या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याने वेस्ट इंडिजमध्ये 6 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 221 धावा केल्या आहेत. तसेच सूर्यकुमार यादवने 6 सामन्यात 216 धावा केल्या आहेत.

रोहितला विश्वविक्रमाची संधी

जर रोहितने या सामन्यात 6 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले, तर तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 200 षटकार पूर्ण करेल. तसेच तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 200 षटकार मारणारा पहिलाच खेळाडू ठरेल.

Suryakumar Yadav
T20 World Cup, IND vs AFG: चहल किंवा कुलदीपला संधी मिळणार संधी, प्लेइंग-11 मध्ये बदल होणार? द्रविडने स्पष्टच सांगितलं

विराट - रोहितमध्ये शर्यत

विराट आणि रोहित यांच्यात सध्या एका वैयक्तिक विक्रमासाठीही शर्यत आहे. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये दोघांनीही प्रत्येकी 4042 धावा केलेल्या आहेत. हे दोघेही आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाच्या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या यादीत पुढे जाण्यासाठी दोघांमध्येही शर्यत आहे.

या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर सध्या 4145 धावांसह बाबर आझम अव्वल क्रमांकावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com