IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनलच्या आशांवर पडणार पावसाचं पाणी? भारताविरुद्धच्या सामन्यावेळी असे आहेत हवामान अंदाज

T20 World Cup 2024: अफगाणिस्तानने टी20 वर्ल्ड कपमधील सुपर-8 च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मोठा उलटफेर केला असल्याने आता सोमवारी होणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
India vs Australia
India vs AustraliaSakal
Updated on

T20 World Cup 2024, India vs Australia Weather Updates: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अफगाणिस्तानने मोठा उलटफेर केला आहे. त्यांनी माजी विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला सुपर-8 च्या सामन्यात 21 धावांनी पराभूत केले. त्यामुळे आता सुपर-8 मधून उपांत्य फेरी गाठण्याची शर्यत आणखी रोमांचक झाली आहे.

आता सुपर-8 मध्ये अ ग्रुपमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष आहे. हा सामना सोमवारी (24 जून) डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस आयलेट, सेंट ल्युसिया येथे हा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता, तर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाणार आहे.

दरम्यान, सोमवारी सेंट ल्युसियामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच सामन्याच्या वेळेतही तिथे ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर पावसाची शक्यताही आहे. AccuWeather च्या रिपोर्टनुसार सामन्यादरम्यान शनिवारी 30 टक्क्याच्या आसपास पावसाची शक्यता आहे.

त्यामुळे सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर पावसामुळे सामन्यात अडथळा आला, तर डकवर्थ लुईस नियमाचाही वापर होऊ शकतो. तसेच पावसामुळे सामना शक्य झाला नाही, तर मात्र सामना रद्द होऊ शकतो.

India vs Australia
IND vs BAN, Video: ऋषभ पंतला मिळालं नवं टोपन नाव, फिल्डिंग मेडल सोहळ्यात दिग्गज विव रिचर्ड्सनेच केलं जाहीर

जर सामना रद्द झाला तर...

जर सामना रद्द झाला, तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला जाईल. यासह भारतीय संघ एकूण 5 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश पक्का करेल, तर ऑस्ट्रेलियाला मात्र बांगलादेशने अफगाणिस्तानला पराभूत करावे अशी अशा बाळगावी लागेल.

कारण सध्या ऑस्ट्रेलियाने सुपर-8 मध्ये 2 सामन्यांपैकी 1 विजय आणि 1 पराभवासह 2 गुण मिळवलेले आहेत. अशात सामना रद्द झाल्यास त्यांचे ३ गुण होती. तसेच अफगाणिस्तानाचेही 1 विजय आणि 1 पराभवासह 2 गुण आहेत. त्यामुळेच जर अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत केले, तर त्यांचे 4 गुण होतील.

कसे आहे एकूण समीकरण

सध्या सुपर-8 मधील अ ग्रुपमध्ये भारतीय संघ दोन विजयांमुळे 4 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया चांगल्या नेट रन रेटमुळे अफगाणिस्तानच्या पुढे दुसऱ्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर बांगलादेश दोन्ही पराभवांमुळे शून्य गुणांसह शेवटच्या क्रमांकावर आहे.

India vs Australia
T20 World Cup: अन् तिथेच इंग्लंडने मॅच गमावली, पाहा द. आफ्रिकेच्या कर्णधाराने मागे पळत येत पकडलेला अविश्वसनीय कॅच

तसेच सुपर-8 मध्ये आता भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना 24 जूनला, तर अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना 25 जूनला होईल. अशात जर भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले, तर भारतीय संघ थेट उपांत्य फेरी गाठेल.

मात्र ऑस्ट्रेलियाला ही आशा करावी लागेल, की बांगलादेश अफगाणिस्तानला पराभूत करेल. जर असे झाले, तर चांगल्या नेट रन रेटमुळे ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहचेल. पण जर अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत केले, तर ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपेल.

त्याचबरोबर जर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले आणि अफगाणिस्ताननेही बांगलादेशला पराभूत केले, तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या तिन्ही संघांचे 4 गुण होतील, अशात चांगल्या नेट रन रेट असलेले दोन संघ उपांत्य फेरीत जातील.

त्याचबरोबर जर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले आणि बांगलादेशने अफगाणिस्तानला पराभूत केले, तर अफगाणिस्तानचे आव्हान संपेल आणि भारत व ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीतील स्थान पक्के करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.