T20 World Cup 2024: भारताविरुद्ध कमिन्स साधणार हॅट्रिकची हॅट्रिक? सुपर-8 मधील दोन्ही सामन्यात रचलाय इतिहास

Pat Cummins: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सुपर-8 फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात पॅट कमिन्सला अनोखा विक्रम रचण्याची संधी आहे.
Pat Cummins | Australia Cricket Team
Pat Cummins | Australia Cricket TeamSakal

T20 World Cup 2024, India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्र्लिया संघात टी20 वर्ल्ड कप 2024 मधील सुपर-8 फेरीतील सामना होणार आहे. सोमवारी (24 जून)होणारा हा सामना डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, सेंट ल्युसिया येथे पार पडणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाणार आहे.

दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला एक मोठ्या आणि अनोख्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. कमिन्सला या सामन्यात हॅट्रिकची हॅट्रिक करण्याची संधी आहे. म्हणजेच जर त्याने या सामन्यात हॅट्रिक केली, तर तो सलग तीन सामन्यांत हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरेल.

Pat Cummins | Australia Cricket Team
T20 World Cup: नवा ट्विस्ट! ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान जाणार बाहेर, तर बांगलादेश मारणार सेमीफायनलमध्ये एन्ट्री? जाणून घ्या गणित

कमिन्स घेतल्यात सलग दोन हॅट्रिक

सुपर-8 फेरीत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 28 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात कमिन्सने महमुद्दुलाह, मेहदी हसन आणि तौहिद हृदोय या बांगलादेशच्या तीन फलंदाजांना सलग तीन चेंडूत बाद केले होते.

तसेच नंतर अफगाणिस्तानविरुद्ध सुपर-8 चा दुसरा सामना खेळताना कमिन्सने राशिद खान, करिम जनात आणि गुलबदिन नायब या तिघांना सलग तीन चेंडूत बाद करत हॅट्रिक घेतली होती.

त्यामुळे तो टी20 वर्ल्ड कपमध्ये दोन हॅट्रिक घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला होता. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सलग दोन सामन्यात हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता.

याशिवाय कमिन्स टी20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेणारा ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोलंदाजही आहे. यापूर्वी ब्रेट ली याने 2007 टी20 मध्ये हॅट्रिक घेतली होती.

दरम्यान कमिन्सने टी20 वर्ल्ड कपमध्ये 21 सामने खेळले असून 23 विकेट्स घेतल्या आहेत.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com