Video: सचिन तेंडुलकरने ज्या कॅचचं केलं भरभरून कौतुक, त्यासाठी अक्षरला Team India च्या ड्रेसिंग रुममध्ये मिळालं मोठं बक्षीस

Axar Patel: टी२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये अक्षर पटेलच्या क्षेत्ररक्षणाचे विशेष कौतुक करण्यात आले.
Axar Patel - Sachin Tendulkar
Axar Patel - Sachin TendulkarSakal
Updated on

T20 World Cup 2024 India vs Australia: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारतीय संघाने सोमवारी (24 जून) सुपर-8 मधील आपल्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी पराभूत केलं. यासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

दरम्यान, या सामन्यानंतरही प्रथेप्रमाणे भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला फिल्डिंग मेडल देण्यात आले. यंदा या सामन्यातील फिल्डिंग मेडलचा मानकरी अष्टपैलू अक्षर पटेल ठरला. याचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी कॅरेबियन बेटांवर क्षेत्ररक्षण करणे कठीण असल्याचे सांगत खेळांडूनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच त्यांनी असंही म्हटलं की इथे आपण वर्चस्व गाजवायला आलेलो आहोत.

यानंतर त्यांनी हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, रोहित शर्मा आणि अक्षर पटेल यांची हे मेडल जिंकण्यासाठी उमेदवार म्हणून घोषणा केली.

Axar Patel - Sachin Tendulkar
Team India: शुभमन गिल टीम इंडियाचा कॅप्टन! 'या' मालिकेसाठी झाली 15 जणांच्या संघाची घोषणा

यानंतर विजेत्या अक्षर पटेलला भारतीय संघाच्य सपोर्ट स्टाफमधील थ्रोडाऊन स्पेशालिस्ट नुवान सेनेविरत्नेच्या हस्ते हे मेडल देण्यात आले.

अक्षरने या सामन्यात गोलंदाजीबरोबरच शानदार क्षेत्ररक्षण केले. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शचा उजव्या हाताने महत्त्वाचा झेल घेतला. भारताने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मार्श शानदार लयीत फलंदाजी करत होता. त्याने आणि ट्रेविस हेडने अर्धशतकी भागीदारीही केली होती.

मात्र, त्यांची भागीदारी 9 व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर तुटली. कुलदीपने टाकलेल्या चेंडूवर मार्शने स्क्वेअरला मोठा शॉट खेळला, त्यावर अक्षरने उडी मारत उजव्या हाताने अफलातून झेल पकडला. त्यामुळे मार्श 28 चेंडूत 37 धावा करून बाद झाला.

सचिननेही केलं कौतुक

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही अक्षरने घेतलेल्या या झेलचे कौतुक केले. तसेच जसप्रीत बुमराहने घेतलेल्या ट्रेविस हेडच्या विकेटचेही कौतुक केले.

सचिनने ट्वीट केले की 'टीम इंडिया, शानदार! या विजयातील दोन महत्त्वाचे क्षण म्हणजे बाऊंड्रीजवळ अक्षर पटेलने घेतलेला अफलातून झेल आणि जसप्रीत बुमराहने घेतलेली ट्रविस हेडची विकेट. उपांत्य फेरीची आता उत्सुकता आहे.'

भारताचा विजय

भारतासाठी मार्श आणि हेडची विकेट अत्यंत महत्त्वाची ठरली. कारण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत नियमित अंतराने विकेट्स घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 बाद 181 धावांपर्यंतच पोहचला आले. हेडने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 76 धावांची खेळी केली होती.

Crossword Mini:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.