T20 World Cup 2024: भारत-इंग्लंड संघात काट्याची टक्कर; आत्तापर्यंत कोण ठरलंय टी20 मध्ये वरचढ?

India vs England: भारत आणि इंग्लंड संघात टी20 वर्ल्ड कपमधील उपांत्य सामना गुरुवारी खेळवला जाणार आहे. या दोन संघांची आत्तापर्यंतची आमने-सामने आकडेवारी कशी राहिली आहे, जाणून घ्या.
India vs England
India vs EnglandSakal
Updated on

T20 World Cup 2024, India vs England: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसरा सामना भारत आणि इंग्लंड संघात खेळवला जाणार आहे. हा सामना गयानामधील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी (27 जून) रात्री 8 वाजता हा सामना सुरू होणार आहे.

भारत आणि इंग्लंड हे संघ सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत लढणार आहेत. यापूर्वी 2022 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतही भारत आणि इंग्लंड संघात उपांत्य सामना झाला होता, त्यावेळी इंग्लंडने विजय मिळवला होता.

India vs England
IND vs ENG: 'भारताला हरवायचे असेल, तर...', सेमीफायनलपूर्वी इंग्लंडला टी20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचा इशारा

दरम्यान, भारत आणि इंग्लंड संघात आत्तापर्यंत 23 टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील भारताने 12 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 11 सामने जिंकले आहेत. तसेच भारत आणि इंग्लंड संघात टी20 वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत 4 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यात 2 सामने भारताने जिंकले आहेत, तर 2 सामने इंग्लंडने जिंकले आहेत.

एकूणच ही आकडेवारी पाहिली, तर दोन्ही संघांनी एकमेकांनी तोडीस तोड उत्तर दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता गुरुवारी या दोन संघांपैकी कोणता संघ विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश करणार हे पाहाणे रंजक ठरणार आहे.

India vs England
T20 World Cup: राशीद खानवर ICC ची सेमीफायनलपूर्वीच कारवाई; अफगाणिस्तानच्या कर्णधाराची 'ती' चूक पडली महागात

हे माहित आहे का?

टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर यांनी आत्तापर्यंत सारख्याच धावा केल्या आहेत. रोहितने 6 सामन्यांत 120 चेंडूंचा सामना करताना 191 धावा केल्या आहेत. त्याचा 159.16 स्ट्राईक रेट आहे. बटलरनेही 7 सामन्यांत 120 चेंडूंचा सामना करतानाच 191 धावा केल्या आहे, तर त्याचाही स्ट्राईक रेट 159.16 आहे.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com