T20 World Cup: टीम इंडियाची बार्बाडोसच्या बीचवर दंगा मस्ती; विराट अन् रिंकू तर...; पाहा Video

Team India: टी20 वर्ल्ड कपमधील भारतीय संघाचा सुपर-8 मधील पहिला सामना बार्बाडोसमध्ये होणार आहे. त्याआधी भारतीय खेळाडू बीचवर दंगा मस्ती करत असतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
Team India | Virat Kohli | Rinku Singh
Team India | Virat Kohli | Rinku SinghSakal
Updated on

Team India playing Beach Volleyball: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत सुपर-8 फेरीत प्रवेश केला आहे. आता भारताला सुपर-8 मधील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध 20 जून रोजी बार्बाडोसमधील ब्रिजटाऊन येथील केनसिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

त्यामुळे भारतीय संघ बार्बाडोसला पोहचला असून सध्यातरी सरावापूर्वी थोड्या रिलॅक्स मुडमध्ये दिसला आहे. भारतीय संघाने बार्बाडोसला पोहचल्यानंतर बीच व्हॉलिबॉल खेळण्याचाही आनंद लुटला. याचा व्हिडिओही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Team India | Virat Kohli | Rinku Singh
IND vs AFG T20 WC Super-8 : कधीपासून रंगणार सुपर-8चा थरार? भारताचा पहिला सामना कोणाशी; जाणून घ्या Details

या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य देखील दोन संघ करून बीच व्हॉलिबॉल खेळताना दिसत आहे. यावेळी खेळाडूं एकमेकांची मस्करी करताना, मस्ती करतानाही दिसत आहे.

व्हिडिओत विराट कोहली, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल आर्शदिप सिंग, युजवेंद्र चहल यांच्याबरोबरच राखीव खेळाडू असलेले रिंकु सिंह आणि खलील अहमदही दिसत आहे. बरेचसे खेळाडू शर्टलेस होऊन खेळताना दिसत आहेत.

दरम्यान, रिंकु सिंह आणि विराट तर खुप मस्ती करतानाही दिसताहेत. विराट एका क्षणी बॉल घेऊन नाचतानाही या व्हिडिओमध्ये दिसला आहे.

Team India | Virat Kohli | Rinku Singh
T20 World Cup मधील सुपर-8 आहे तरी काय, भारत-ऑस्ट्रेलिया एकाच गटात कसे? जाणून घ्या सर्व काही

दरम्यान, भारताचे या स्पर्धेतील पहिल्या फेरीचे सामने अमेरिकेत झाले होते. त्यानंतर आता भारतीय संघाला सुपर-8 मधील सामने कॅरेबियन बेटांवर म्हणजेच वेस्ट इंडिजमध्ये खेळायचे आहेत.

भारतीय संघाने पहिल्या फेरीत पाकिस्तान, आयर्लंड आणि अमेरिका संघांना पराभूत केले होते, तर कॅनडाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता सुपर-8 मध्ये भारतीय संघ अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध सामने खेळणार आहे.

भारताचे सुपर-8 फेरीचे वेळापत्रक

(वेळ - भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता)

  • 20 जून - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, बार्बाडोस

  • 22 जून - भारत विरुद्ध बांगलादेश/नेदरलँड्स, अँटिग्वा

  • 24 जून - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सेंट लुसिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.