IND vs USA: अमेरिकेनं भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधारच बदलला; जाणून घ्या मोठ्या निर्णायामागील कारण

Monank Patel: अमेरिकेचा नियमित कर्णधार मोनांक पटेलला भारताविरुद्धच्या टी20 वर्ल्ड कपमधील सामन्याला मुकावे लागले. यामागील कारण जाणून घ्या.
Monank Patel
Monank PatelSakal
Updated on

T20 World Cup 2024, India vs USA: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत बुधवारी भारत विरुद्ध अमेरिका संघात सामना खेळला गेला. न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यापूर्वी अमेरिकेला मोठा निर्णय घ्यावा लागला.

या सामन्यात अमेरिकेचा नियमित कर्णधार मोनांक पटेल खेळला नाही. त्याच्याऐवजी ऍरॉन जोन्सने या सामन्याच नेतृत्व केले. मोनांकला भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी खांद्याला दुखापत झाली आहे. त्याचमुळे त्याला भारताविरूद्धच्या सामन्याला मुकावे लागले आहे.

दरम्यान, त्याची दुखपत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मात्र नाणेफेकीवेळी बोलताना प्रभारी कर्णधार ऍरॉन जोन्सने त्याच्याबद्दल माहिती दिली होती की त्याला छोटी दुखापत असून आशा आहे की तो लवकरच पुनरागमन करेल.

Monank Patel
T20 World Cup: फलंदाज नाबाद असूनही बांगलादेशला का नाकारण्यात आला चौकार? काय सांगतो ICC चा नियम, घ्या जाणून

या सामन्यासाठी मोनांकच्या जागेवर अमेरिकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये शायन जहांगिरला संधी दिली. तसेच याव्यतिरिक्त अमेरिकने प्लेइंग इलेव्हनमध्ये आणखी एक बदल केला.

अमेरिकेने शॅडमी वॅन शाल्कविकला नॉस्टुश केंजिगेच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

मोनांक आहे चांगल्या फॉर्ममध्ये

मोनांक सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे तो संघात नसणे हा अमेरिकेसाठी मोठा फटका मानला जात आहे. आता अमेरिकेला आशा असेल की मोनांकचे 14 जूनला आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पुनरागमन होईल.

मोनांकने यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये कॅनडाविरुद्ध 16 धावा केल्या होत्या, तर पाकिस्तानविरुद्ध 50 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

Monank Patel
T20 World Cup: पाकिस्तानच्या रिझवानची रोहित शर्माच्या T20 मधील वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी, जाणून घ्या काय केलाय विक्रम

भारत - अमेरिकेचे प्लेइंग इलेव्हन

  • भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (कर्णधार), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

  • अमेरिका: स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (यष्टीरक्षक), ऍरॉन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरे अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावळकर, अली खान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.