T20 World Cup: सुपर ओव्हर रंगलेल्या ओमान-नामिबिया सामन्यात रचला गेला इतिहास; यापूर्वी T20I मध्ये असं कधीच झालं नव्हतं

Namibia vs Oman: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सोमवारी झालेल्या ओमान आणि नामिबिया सामन्यादरम्यान अनोखा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे.
 Bernard Scholtz | Namibia
Bernard Scholtz | NamibiaSakal
Updated on

T20 World Cup: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील तिसरा सामना नामिबिया विरुद्ध ओमान संघात सोमवारी (३ जून) झालाय. ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे झालेल्या या सामन्यात नामिबियाने सुपर ओव्हरमध्ये विजयाची नोंद केली.

दरम्यान, या सामन्यात एक अनोखा विक्रमही नोंदवला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला ओमान संघ 19.4 षटकात 109 धावांवर सर्वबाद झाला. त्यांच्या संघातील 10 पैकी 6 खेळाडू पायचीत होऊन बाद झाले. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं झालं की एकाच डावात 6 फलंदाज पायचीत झाले.

यापूर्वी 2021 टी20 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सचे 5 फलंदाज श्रीलंकेविरुद्ध पायचीत झाले होते. याच टी20 वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंडच्याही 5 फलंदाजांनी अफगाणिस्तानविरुद्ध पायचीत होत विकेट गमावली होती.

इतकेच नाही, तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्येही पहिल्यांदाच असे झाले की 6 फलंदाज पायचीत झाले.

 Bernard Scholtz | Namibia
T20 World Cup: सुपर ओव्हरचा हिरो! बॅटिंगच नाही, तर बॉलिंगनेही पालटली मॅच, नामियाबियासाठी 39 वर्षीय खेळाडू ठरला तारणहार

ओमानचे कश्यप प्रजापती, अकिब इलियास, झिशन मकसूद, मोगम्मद नदीम, मेहरन खान आणि कलिमुल्लाह हे पायचीत झाले होते.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले तर ओमानकडून खलीद कैलने 34 धावांची खेळी केली, तर झीशन मकसूदने 22 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त २० पेक्षा अधिक धावा कोणाला करता आले नाहीत.

नामिबियाकडून रुबेन ट्रम्पलमनने 4 विकेट्स घेतल्या, तर डेव्हिड विजने 3 विकेट्स घेतल्या. तसेच गेरहार्ड इरॅस्मसने 2 विकेट्स घेतल्या आणि बेनार्ड शोल्ट्झने 1 विकेट घेतली.

 Bernard Scholtz | Namibia
NAM vs OMA T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपच्या तिसऱ्याच मॅचमध्ये रंगली सुपर-ओव्हर! रोमांचक सामन्यात नामिबियाचा विजय

त्यानंतर 110 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 20 षटकात 6 बाद 109 धावाच करता आल्या. त्यामुळे सामन्यात बरोबरी झाली आणि सुपर ओव्हर खेळवण्यात आली. नामिबियाकडून जॅन फ्रायलिंक 45 धावांची खेळी केली. तसेच निकोलस डाविनने 24 धावांची खेळी केली.

ओमानकडून मेहरन खानने 3 विकेट्स घेतल्या, तसेच बिलाल खान, अकिब आणि आयन खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने बिनबाद 21 धावा केल्या, तर ओमानला 1 बाद 10 धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.