T20 World Cup: राशीद खानवर ICC ची सेमीफायनलपूर्वीच कारवाई; अफगाणिस्तानच्या कर्णधाराची 'ती' चूक पडली महागात

Rashid Khan: अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खानने एका नियमाचे उल्लंघन केल्याने आयसीसीने त्याला सक्त ताकीद दिली आहे.
Rashid Khan
Rashid Khan X/ACBofficials

ICC reprimand Rashid Khan: अफगाणिस्तान संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा उपांत्य सामना गुरुवारी (27 जून) खेळायचा आहे. पण त्याआधीच आयसीसीने अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खानला नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल सक्त ताकीद दिली आहे.

राशीद बांगलादेशविरुद्ध झालेल्या सुपर-8 मधील सामन्यात फलंदाजी करत असताना आपलाच साथीदार करिम जनतवर भडकला होता आणि त्याने बॅट फेकली होती. त्यामुळे आयसीसीने त्याला अधिकृतपणे चेतावणी दिली असून त्याच्या डिसिप्लिनरी रेकॉर्डमध्ये एक डिमीरिट पाँइंट्सही देण्यात आला आहे. ही त्याची गेल्या 24 महिन्यातील पहिली चूक होती.

Rashid Khan
T20 World Cup 2024: भारत-इंग्लड सेमीफायनलसाठी का नाही राखीव दिवस? जाणून घ्या कारण

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (25 जून) बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात राशिदने आयसीसीच्या आचार संहितेतील नियमाच्या लेव्हल-1 चे उल्लंघन केले आहे. त्याने कलम 2.9 चे उल्लंघन केल्याचे आढळले आहे.

आयसीसीच्या आचार संहितेतील हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यांत चूकीच्या पद्धतीने किंवा धोकादायक पद्धतीने चेंडू किंवा क्रिकेटचे इतर कोणतेही साधन दुसऱ्या खेळाडूवर किंवा त्याच्या जवळ फेकण्याबद्दल आहे. याच कलमाच्या उल्लंघनाबद्दल त्याला आयसीसीने चेतावणी दिली आहे आणि डिमीरिट पाँइंटही दिला आहे.

त्याची शिक्षा आयसीसीचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी सुनावली असून त्याने ती मान्य केली आहे. त्याच्यावर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील मैदानातील पंच नितीन मेनन आणि लँगटन रुसेरे, तिसरे पंत ऍड्रियन होल्डस्टॉक आणि फोर्थ अंपायर अहसान रझा यांनी आरोप लावले होते.

नक्की काय झालेलं?

अफगाणिस्तान संघ प्रथम फलंदाजी करत होता. यावेळी धावा करताना त्यांना बराच संघर्ष करावा लागला होता. अशाच 20 व्या षटकात बांगलादेशकडून तंजीम हसन साकिब गोलंदाजी करत होता. त्याच्या या षटकात करिमने पहिल्या चेंडूवर एक धाव काढली. त्याच्या पुढच्या चेंडूवर राशीदने षटकार खेचला.

यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याला दोन धावा काढायच्या होत्या. मात्र करिमने दुसरी धाव घेण्यास नकार दिला. त्यावेळी राशीद दुसऱ्या धावेसाठी बराच पुढे आला होता. त्याचमुळे तो भडकला आणि त्याने करिमच्या दिशेने बॅट फेकली. त्यानंतर जेव्हा करिम त्याची बॅट घेऊन त्याच्याकडे परत आला, तेव्हाही राशीद भयानक चिडलेला दिसत होता.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर अफगाणिस्तानने या सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला आणि पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com