T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा शेवटच्या चेंडूवर बांगलादेशविरुद्ध रोमांचक विजय; सुपर-8 मध्येही थाटात एन्ट्री

SA vs BAN: दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय मिळवला आणि सुपर-8 मधील प्रवेशही निश्चित केला.
South Africa | T20 World Cup 2024
South Africa | T20 World Cup 2024X/ICC
Updated on

T20 World Cup 2024, South Africa vs Bangladesh: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 21 वा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 4 धावांनी रोमांचक विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेचा हा या स्पर्धेतील तिसरा विजय ठरला. त्यामुळे त्यांचा सुपर-8 मधील प्रवेश निश्चित झाला आहे. तसेच बांगलादेशला मात्र या स्पर्धेतील दोन सामन्यांपैकी एक विजय आणि एक पराभव स्विकारावा लागला आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 114 धावांचा यशस्वी बचाव केला. त्यामुळे टी२० वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात कमी धावांचा यशस्वी बचाव करण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे.

114 धावा करताना बांगलादेशच्या आले नाके नऊ

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 114 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने सलामीवीर तांझिद हसनची विकेट लवकर गमावली होती. तसेच लिटन दास आणि शाकिब अल हसनही स्वस्तात बाद झालेला. त्यामुळे 37 धावांवर बांगलादेशने 3 विकेट्स गमावल्या होत्या.

त्यातच कर्णधार नजमूल हुसैन शांतोलाही संयमी सुरुवात करूनही खास काही करता आले नाही आणि तोही 14 धाावंवर बाद झाला. पण यानंतर तोहिद हृदोय आणि महमुद्दुलाह यांनी डाव सावरला होता. त्यांनी 44 धावांची भागीदारी केली होती. त्यामुळे बांगलादेशच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

हे दोघे खेळत होते, तोपर्यंत बांगलादेशसाठी विजय सोपा वाटत होता, मात्र रबाडाने हृदोयला 37 धावांवर पायचीत केले आणि दक्षिण आफ्रिकेला सामन्यात परत आणले. त्यानंतर बांगलादेशकडून खेळायला आलेल्या जेकर अलीला फार काही करता आले नाही.

शेवटच्या षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी किफायतशीर गोलंदाजी केली. त्यामुळे अखेरच्या षटकात बांगलादेशला 11 धावांची गरज होती. यावेळी केशव महाराज दक्षिण आफ्रिकेसाठी गोलंदाजी करत होता.

त्याने तिसऱ्या चेंडूवर अलीला बाद केले, तर पाचव्या चेंडूवर महमुद्दुलाह 20 धावांवर बाद झाला. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर 6 धावा असे समीकरण होते. यावेळी तस्किन अहमदला एकच धाव घेता आली. त्यामुळे बांगलादेशचा डाव 20 षटकात 7 बाद 109 धावांवर संपला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात विजयावर शिक्कामोर्तब केले.

दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत केशव महाराजने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

South Africa | T20 World Cup 2024
T20 World Cup 2024: भारताविरुद्ध पराभवानंतरही पाकिस्तानच्या आशा जिंवत, जाणून घ्या कसे आहे सुपर-8 साठी समीकरण

क्लासेन-मिलरने दक्षिण आफ्रिकेला तारले

तत्पुर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही फारशी चांगली झाली नव्हती.

रिझा हेन्ड्रिक्स आणि ट्रिस्टन स्टब्स यांना भोपळाही फोडता आला नाही. तसेच आक्रमक सुरुवात केलेला क्विंटन डी कॉकही 18 धावांवर बाद झाला. कर्णधार एडेन मार्करम 4 धावा करून परतला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था 4 बाद 23 धावा अशी झाली होती.

मात्र यानंतर हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी संयमी खेळ करत दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. त्यांनी 79 धावांची भागादारी करत दक्षिण आफ्रिकेला 100 धावांचा टप्पा पार करून दिला.

मात्र 18 व्या षटकात क्लासेन 44 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. त्याच्या पुढच्याच षटकात मिलर 29 धावांवर बाद झाला. अखेरीस मार्को यान्सिन (5) आणि केशव महाराज (4) यांनी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 6 बाद 113 धावांपर्यंत पोहचवले.

बांगलादेशकडून तांझिम हसन साकिबने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच तस्किन अहमदने 2 विकेट्स घेतल्या आणि रिषाद हुसैनने 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.