T20 World Cup: डी कॉक आऊट होता की नॉट आऊट? मार्क वूडने घेतलेल्या त्या कॅचमुळे चर्चेला उधाण

South Africa vs England: मार्क वूडने घेतलेल्या कॅचवर डी कॉकला नॉटआऊट देण्यात आले होते, पण सामन्यानंतर या निर्णयाची बरीच चर्चा झाली.
Quinton de Kock
Quinton de Kock Sakal

T20 World Cup 2024, South Africa vs England: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला अवघ्या 7 धावांनी पराभूत केले. हा दक्षिण आफ्रिकेचा सुपर-8 मधील दुसरा विजय ठरला. मात्र, या सामन्यातील क्विंटन डी कॉकच्या एका झेलची चांगलीच चर्चा झाली.

झाले असे की सेंट लुसिया येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली होती. यावेळी सलामीला उतरलेला क्विंटन डी कॉक चांगल्या लयीत खेळताना दिसत होता. त्याने आक्रमक अर्धशतकही केले होते.

Quinton de Kock
T20 World Cup: भारत-बांगलादेश संघात सुपर-8 ची महत्त्वाची लढत! हेड-टू-हेड रेकॉर्ड अन् हवामान, जाणून घ्या सर्व डिटेल्स

मात्र, आदिल राशिदने गोलंदाजी केलेल्या नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डीकॉकने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मोठा शॉट खेळला. पण तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या मार्क वूडने तो चेंडू जमनीलगत पकडला, त्यामुळे इंग्लंडने विकेटसाठी अपील केले. परंतु, डी कॉक या झेलाबद्दल साशंक असल्याने त्याने पंचांशी चर्चाही केली.

अखेर मैदानातील पंचांनी थर्ड अंपायरकडे हा निर्णय सोपवला. अनेक रिप्ले पाहिल्यानंतर तो चेंडू वूड झेलत असताना जमीनीला लागल्याचे दिसत असल्याने थर्ड अंपायरने डी कॉकला नाबाद ठरवले. त्यामुळे 58 धावांवर डी कॉकला जीवदान मिळाले. पण या झेलाबद्दल बरीच चर्चा सामन्यानंतर झाली.

मात्र त्यानंतर डी कॉक फार काळ टीकू शकला नाही. त्याला 12 व्या षटकात 65 धावांवर जोफ्रा आर्चरने बाद केले. त्याचा झेल जोस बटलरने पकडला.

Quinton de Kock
T20 World Cup: अन् तिथेच इंग्लंडने मॅच गमावली, पाहा द. आफ्रिकेच्या कर्णधाराने मागे पळत येत पकडलेला अविश्वसनीय कॅच

या सामन्यात डी कॉक बाद झाल्यानंतर मिलरनेही चांगली फलंदाजी केली. त्याने 28 चेंडूत 43 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 6 बाद 163 धावा करता आल्या.

त्यानंतर 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 षटकात 6 बाद 156 धावा करता आल्या. इंग्लंडकडून हॅरी ब्रुकने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. तसेच लियाम लिव्हिंगस्टोनने 33 धावांची खेळी केली. मात्र, त्यांना इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवता आले नाही.

गोलंदाजीत इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच मोईन अली आणि आदिल राशिद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर ओटनील बार्टमन आणि एन्रिच नॉर्किया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com