'ग्रुप A'मध्ये समीकरण झाले रंजक! ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून होणार बाहेर... कोणता संघ सेमी-फायनलमध्ये मारणार एन्ट्री?

T20 World Cup 2024 Semifinal Qualification Scenario : टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज मोठा अपसेट पाहायला मिळाला. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाचा प्रथमच पराभव केला आहे.
T20 World Cup 2024 Group A Points Table
T20 World Cup 2024 Group A Points Tablesakal

T20 World Cup 2024 Group A Points Table : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. या फॉरमॅटचा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा अफगाणिस्तानने पराभव केला. या संपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ संघर्ष करताना दिसला. आधी अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला विकेट्ससाठी रडवले. त्यानंतर अफगाच्या गोलंदाजांनी आपल्या करिष्माई गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

अफगाणिस्तानने हा सामना 21 धावांनी जिंकून उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा जिंवत ठेवल्या. यासोबतच आता ग्रुप A'मध्ये समीकरणे पूर्णपणे गुंतागुंतीची झाली आहेत. गटातील कोणता संघ उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतो? समीकरण समजून घेऊ.....

T20 World Cup 2024 Group A Points Table
Video : भारत-बांगलादेश मॅचमध्ये हे काय घडलं? विराट कोहली घुसला स्टेजखाली, व्हिडिओ होतोय व्हायरल

भारताचा मार्ग सुकर (India T20 World Cup 2024 Semifinal Qualification Scenario) -

ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे भारताचा मार्ग सुकर झाला आहे. भारताने आतापर्यंत 2 सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. भारताचा नेट रन रेट +2.425 आहे. संघाचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने हा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीत अपराजित राहता येईल.

मात्र, भारताने हा सामना गमावला तरी भारताला उपांत्य फेरी गाठणे इतके अवघड जाणार नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना 24 जून रोजी होणार आहे.

T20 World Cup 2024 Group A Points Table
Afg vs Aus : जोर का झटका धीरे से... टी-20 वर्ल्ड कपमध्ये मोठी उलथापालत! अफगाणिस्तानने चॅम्पियन ऑस्ट्रेलियाच्या ठेचल्या नांग्या

ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून होणार बाहेर... (Australia T20 World Cup 2024 Semifinal Qualification Scenario) -

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवून या वर्ल्ड कपमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपसेट केला आहे. या सामन्यातील पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलिया सध्या 2 सामन्यांतून 2 गुणांसह गटात दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर त्यांचा नेट रन रेटही खाली आला आहे. ऑस्ट्रेलियाचा सध्याचा नेट रन रेट +0.223 आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल.

ऑस्ट्रेलिया संघाने भारताविरुद्धचा पुढचा सामना जिंकला आणि अफगाणिस्तानने बांगलादेशला त्याच्या पुढच्या सामन्यात पराभूत केले. तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी ४ गुण होतील. अशा परिस्थितीत नेट रन रेटच्या आधारावर संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. त्याचवेळी जर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचा सामना गमावला आणि अफगाणिस्ताननेही आपला पुढचा सामना गमावला तर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.

T20 World Cup 2024 Group A Points Table
T20 World Cup 2024 : अंपायरशी वाद भोवला! वर्ल्ड कपदरम्यान संघाच्या स्टार खेळाडूवर ICCने घेतली मोठी ॲक्शन

अफगाणिस्तानचे वाढले मनोबल (Afghanistan T20 World Cup 2024 Semifinal Qualification Scenario) -

भारताविरुद्धच्या दारुण पराभवानंतर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. या सामन्यातील विजयाने अफगाणिस्तानचे मनोबल वाढले आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला बांगलादेशविरुद्धचा पुढील सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल आणि तो पण चांगल्या फरकाने.

अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धचा पुढचा सामना जिंकला आणि भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला नमवले तर अफगाणिस्तान भारतासोबत उपांत्य फेरीत पोहोचेल. त्याचबरोबर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आपापले सामने जिंकल्यास उपांत्य फेरीचा संघ नेट रन रेटच्या आधारावर निश्चित केला जाईल.

T20 World Cup 2024 Group A Points Table
Video : 'काय करतोयस यार...' रोहित शर्माची स्टंप माइक रेकॉर्डिंग पुन्हा व्हायरल, आता कोणावर भडकला कॅप्टन?

बांगलादेश संघाच्या पण आशा जिंवत (Bangladesh T20 World Cup 2024 Semifinal Qualification Scenario) -

या गटात शेवटच्या स्थानावर असलेल्या बांगलादेशलाही उपांत्य फेरी गाठता येईल. यासाठी बांगलादेशला अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. तसेच भारताने ऑस्ट्रेलियाला मोठ्या फरकाने पराभूत करावे अशी बांगलादेशला प्रार्थना करावी लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com