England vs West Indies T20 World Cup 2024 Super 8 : टी-20 वर्ल्ड कप 2024च्या सुपर-8 फेरीत डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आज वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळला गेला. इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केला. फिलिप सॉल्टने इंग्लंडच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने 47 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 87* धावांची खेळी खेळली.
ग्रुप स्टेजचे चारही सामने जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजच्या गाडीला इंग्लंडने ब्रेक लागला. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 वर्ल्ड कपमधील 42 वा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने एकतर्फी विजयाची नोंद केली.
सुपर-8च्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी चांगला ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने 20 षटकांत 4 गडी गमावून 180 धावा केल्या. संघासाठी जॉन्सन चार्ल्सने 34 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 38 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.
लक्ष्याचा पाठलाग करताना फिलिप सॉल्ट आणि कर्णधार जोस बटलर यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची (46 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी आठव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कर्णधार बटलरच्या विकेटने संपुष्टात आली. रोस्टन चेसने बटलरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बटलरने 22 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. त्यानंतर 11व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोईन अलीच्या रूपाने संघाला दुसरा धक्का बसला, त्याला आंद्रे रसेलने आऊट केले. मोईनने 10 चेंडूत 2 चौकारांसह 13 धावा केल्या.
यानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना इंग्लंडची एकही विकेट काढता आली नाही. येथून, फिलिप सॉल्ट आणि जॉनी बेअरस्टोने 97* (44 चेंडू) ची भागीदारी केली आणि संघाला विजयाच्या पलीपर्यंत नेले. सॉल्टने 47 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 87* धावा केल्या. याशिवाय बेअरस्टोने 26 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48* धावा केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.