T20 World Cup 2024 : सुपर-8 च्या शर्यतीत मोठ्या संघांना धक्का! दक्षिण आफ्रिकेची जागा पक्की... माजी चॅम्पियन टीम बाहेर?

T20 World Cup 2024 SA vs BAN : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जात असलेल्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सुपर-8 च्या शर्यतीत अनेक मोठ्या संघांना धक्का बसला आहे.
T20 World Cup 2024 Super 8 Qualification
T20 World Cup 2024 Super 8 Qualificationsakal
Updated on

T20 World Cup 2024 Super 8 Qualification : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जात असलेल्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सुपर-8 च्या शर्यतीत अनेक मोठ्या संघांना धक्का बसला आहे. ज्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, श्रीलंका या संघाचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकन संघाने सोमवारी टी-२० विश्‍वकरंडकातील सलग तिसरा विजय मिळवला. श्रीलंका व नेदरलँड्‌स या संघांना पराभूत केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेश संघावर चार धावांनी मात केली. याचसह दक्षिण आफ्रिकेने सुपर आठ फेरीमधील प्रवेश जवळपास निश्‍चित केला.

T20 World Cup 2024 Super 8 Qualification
Jasprit Bumrah Ind vs Pak : अहमदाबाद ते न्यूयॉर्क...! जसप्रीत बुमराह पाकिस्तानचा कर्दनकाळ

दक्षिण आफ्रिकन संघाकडून मिळालेल्या ११४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशची सुरुवात निराशाजनक झाली. कागिसो रबाडा याने तानझिद हसन याला नऊ धावांवर बाद केले. त्यानंतर नजमुल शांतो (१४ धावा), लिटन दास (नऊ धावा) व शाकीब हसन (तीन धावा) या स्टार खेळाडूंना अपयश आले. त्यानंतर तौहीद हृदोय (३७ धावा) व महमुद्दूलाह (२० धावा) यांनी विजयासाठी प्रयत्न केले; पण कागिसो रबाडा (२/१९), ॲनरिक नॉर्खिया (२/१७) व केशव महाराज (३/२७) यांनी छान गोलंदाजी करीत बांगलादेशला सात बाद १०९ धावांपर्यंत रोखले.

T20 World Cup 2024 Super 8 Qualification
IND vs PAK World Cup : 'त्याने जाणीवपूर्वक चेंडू वाया घालवले...' शोएब मलिकचा पाकिस्तानच्या या खेळाडूवर गंभीर आरोप

दरम्यान, याआधी दक्षिण आफ्रिकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तनझिम साकीब याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. रीझा हेनड्रिक्स (०), क्विंटॉन डी कॉक (१८ धावा), ट्रिस्टन स्टब्स (०) या तीन प्रमुख फलंदाजांना त्याने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तस्कीन अहमद याने कर्णधार एडन मार्करमला चार धावांवरच बाद केले. त्याचा सुमार फॉर्म कायम राहिला. दक्षिण आफ्रिकेची पाचव्या षटकांत चार बाद २३ धावा अशी बिकट अवस्था झाली.

T20 World Cup 2024 Super 8 Qualification
Jasprit Bumrah : गोलंदाजांना श्रेय याचा फार आनंद,बुमरा ; रिझवानला बाद केले तेथेच सामन्याला कलाटणी मिळाली!

हेनरिक क्लासेन व डेव्हिड मिलर या जोडीने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. दोघांनी ७९ धावांची भागीदारी करीत बांगलादेशच्या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावले. दक्षिण आफ्रिकेने शंभरी पार केल्यानंतर क्लासेन याने आपला फलंदाजी गिअर बदलला. तस्कीन अहमदच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात क्लासेन ४६ धावांवर त्रिफळाचीत झाला. या खेळीत त्याने दोन चौकार व तीन षटकार मारले. त्यानंतर लगेचच रिशाद होसेन याने मिलरला २९ धावांवर बाद करीत मोठा अडसर दूर केला. दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत सहा बाद ११३ धावा करता आल्या. बांगलादेशकडून तनझिम साकीब याने १८ धावा देत तीन फलंदाज बाद केले.

माजी चॅम्पियन श्रीलंका बाहेर?

ड गटातून सलग तिसऱ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेने 3 सामन्यांतून 6 गुण घेत सुपर 8 मध्ये स्थान निश्चित केले आहे. त्याचवेळी बांगलादेश आणि नेदरलँड्स 2-2 सामन्यांनंतर 2 गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर नेपाळ आहे, ज्याने केवळ 1 सामना खेळला आहे आणि पराभवाचा सामना केला आहे.

त्याचबरोबर माजी चॅम्पियन श्रीलंका 2 सामन्यांत 2 पराभवांसह शेवटच्या स्थानावर आहे. श्रीलंकेला आता त्यांचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील आणि सुपर 8 मध्ये जाण्यासाठी इतर संघांच्या निकालांवर लक्ष ठेवावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.